साहित्य
- बटाटे - 2
- मीठ - चवीनुसार
- लाल मिरची पावडर - आवडीनुसार
- कॉर्नफ्लोर (मक्याचं पीठ) - 2 चमचे
- तेल - तळण्यासाठी
कृती
- पहिलांदा दोन चांगले बटाटे घ्या. त्यांची सालं काढून घ्या आणि त्यांना लांबट आकारात कापून घ्या. जसे आपण बाजारात फ्रेंच फ्राईज बघतो, अगदी तसेच!
- आता गॅसवर एक पातेलं ठेवा. त्यात पाणी टाका आणि थोडं मीठ घाला. जेव्हा पाण्याला चांगली उकळी येईल, तेव्हा त्यात कापलेले बटाट्याचे तुकडे टाका आणि फक्त 3 मिनिटं उकळू द्या. जास्त वेळ उकळू नका!
- उकळलेले बटाट्याचे तुकडे एका स्वच्छ कपड्यावर काढा आणि त्यातील सगळं पाणी सुकेपर्यंत तसेच ठेवा. पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे.
- आता एका भांड्यात हे सुकलेले बटाट्याचे तुकडे घ्या. त्यात दोन चमचे कॉर्नफ्लोर टाका आणि हळूवारपणे मिक्स करा. कॉर्नफ्लोर सगळ्या बटाट्यांना व्यवस्थित लागला पाहिजे.
- गॅसवर तेल गरम करायला ठेवा. तेल चांगलं तापलं की, त्यात कॉर्नफ्लोर लावलेले बटाट्याचे तुकडे हळू हळू सोडा.
- मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत आणि ते कुरकुरीत होईपर्यंत तळा.
- तळलेले फ्रेंच फ्राईज एका प्लेटमध्ये काढा. त्यावर थोडं मीठ आणि आवडीनुसार लाल मिरची पावडर भुरभुरा.
advertisement
advertisement
advertisement
बस! गरमागरम आणि कुरकुरीत फ्रेंच फ्राईज तयार आहेत! आता तुमच्या मुलांना पोटभर खाऊ घाला आणि त्यांची आवडती डिश घरी बनवण्याचा आनंद घ्या!
हे ही वाचा : चमकदार त्वचा हवीय? तर आवर्जुन वापरा 'हे' पाणी, चेहरा होईल तेजस्वी आणि मुलायम
advertisement
हे ही वाचा : उन्हात स्मार्टफोन ‘ओव्हरहिट’ होतोय? तर फाॅलो करा 'या' 5 टिप्स, फोन कधीच होणार नाही गरम
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 07, 2025 8:38 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
बाहेरचे विसरा! घरच्या घरी बनवा चविष्ट फ्रेंच फ्राईज; अगदी सोपी आहे रेसिपी...