गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गेले तीन दिवस आणि रात्र माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी राबवलेल्या अभियानात तब्बल 71 लाख बक्षीस असलेल्या सात माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सतत तीन दिवस आणि रात्र पोलीस आणि माओवादी यांच्यात प्रचंड गोळीबार सुरू होता. गडचिरोली पोलीस दलाच्या सी सिक्सटी कमांडो पथकांनी 14 तुकड्या मार्फत राबवलेल्या या विशेष अभियानात माओवाद्यांचे दोन शिबीर उद्धवस्त करण्यात आले.
advertisement
गडचिरोलीत झालेल्या चकमकी दरम्यान झालेल्या गोळीबारात गडचिरोली पोलिस दलाच्या जवानांनी 5 हजार राऊंडचा गोळीबार केला तर माओवाद्यांकडून 1 हजार राउंड गोळीबार पोलिसांवर करण्यात आला. या चकमकीत चार पुरुष आणि तीन महिला माओवद्यांसह तब्बल सात माओवादी ठार झाले असून या सगळ्यांवर 80 लाख रुपयाचे बक्षीस होतं. या चकमकीत दीपक आत्राम हे जवान शहीद झाले तर जोगा मडावी हे जवान जखमी झाले त्यांची प्रकृती आता स्थिर आहे अशी माहिती आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत गडचिरोली पोलिसांनी दिली आहे.
मृत माओवाद्यांचे मृतदेह हेलिकॉप्टर मधून गडचिरोलीत आणून त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. पाच वर्षात 99 माओवाद्यांना ठार करण्यात आल असून 140 जणांना अटक करण्यात आली आहे तर 153 जणांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उर्वरित माओवाद्यांनी शस्त्र सोडून आत्मसमर्पण करावं असा आवाहन गडचिरोली पोलिसांनी केलं आहे.
शहीद जवान दीपक मडावी यांच्या कुटुंबाला २.२५ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा
गडचिरोलीच्या नारायणपूर भागात नक्षलवाद्यांविरुद्ध लढताना वीरमरण प्राप्त झालेले सी-६० पथकाचे जवान दीपक चिन्ना मडावी (३८) यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. माओवादाचे समूळ उच्चाटन करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या समाजमाध्यमांवर भावना व्यक्त केल्या. या मोहिमेत ७ माओवाद्यांचा खात्मा करणाऱ्या जवानांच्या शौर्याचे कौतुक करतानाच, मुख्यमंत्र्यांनी शहीद जवानाच्या कुटुंबाला २.२५ कोटी रुपयांची मदत आणि शासकीय नोकरी देण्याची घोषणा ६ फेब्रुवारी रोजी या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये केली.
हे ही वाचा :
