बालविर अजय पवार असे गळा आवळून खून झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून अजय आणि त्याची बहीण गौरी अजय पवार हे याच आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेत आहेत. अजय रात्री जेवण झाल्यानंतर झोपला. सकाळी तो उठत नसल्याने शाळा वसतिगृह प्रशासनाने त्याला झोपेतून उठविण्याचा प्रयन्त केला मात्र तो श्वास घेत नसल्याचे लक्षात येताच शाळा प्रशासनाने पोलिसांना कळवत त्याला उपचारासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
advertisement
मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या गळ्यावर व्रण असल्याच्या संशयातून नातेवाईकांनी भोकरदन पोलिसांनी या प्रकरणी तपास करावा, अशी विनंती केली. अधिक तपास केला असता अजयचे शाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या मुलांसोबत भांडण झाल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी शाळेतील दोन विद्यार्थ्यांना ट्रेस करत ताब्यात घेतले असता त्यांनीच भांडणाच्या वादातून रात्री झोपेत त्याचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिलीये. पोलिसांनी या दोन दहा वर्षीय विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
