TRENDING:

Maharashtra Election Result 2024 LIVE Updates: अब की बार लाडक्या बहिणींचं सरकार, मुख्यमंत्री कोण होणार?

Last Updated:

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 LIVE Updates: पुन्हा एकदा सत्ताधारी महायुतीचं सरकार येणार हे आता स्पष्ट झालं आहे. महायुतीची त्सुनामी आली आहे. भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या आहे. तर त्यापाठोपाठ शिवसेनेनं ५७ आणि अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: विधानसभा निवडणुकीचा निकाल  आता स्पष्ट झाला आहे. पुन्हा एकदा सत्ताधारी महायुतीचं सरकार येणार हे आता स्पष्ट झालं आहे. महायुतीची त्सुनामी आली आहे. भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या आहे. तर त्यापाठोपाठ शिवसेनेनं ५७ आणि अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या आहे. तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना मिळून फक्त 50 जागा मिळाल्या आहे.  आता लवकरच महायुतीकडून सरकार स्थापनेचा दावा केला जाणार आहे, त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार हे पाहण्याचं ठरणार आहे.
News18
News18
advertisement
November 23, 20246:07 PM IST

Uddhav Thackeray : अनाकलनीय, लाटेपेक्षा त्सुनामीच आल्याचं वातावरण, निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

विधानसभा निकालानंतर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की,  निकाल कसा लागला हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. जे जिंकले त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांनी प्रामाणिक पणाने मविआच्या उमेदवारांना मतं दिली त्यांचं आभार मानतो. लाटेपेक्षा त्सुनामीच आली असं वातावरण निकालाने दिसतंय. पण हा निकाल, सर्वसामान्य जनतेला पटलाय की नाही हा प्रश्न आहे. एकूण आकडे जे दिसतायत ते आकडे पाहिले असता असं वाटतं की या सरकारला अधिवेशनात एखादं बिल मंजुरीसाठी मांडण्यासाठी आवश्यक असे आकडे आहेत. विरोधी पक्षच शिल्लक ठेवायचे नाही. भाजपचे सध्याचे अध्यक्ष बोलले होते की एकच पक्ष राहील. वन नेशन, वन इलेक्शन आणि वन पार्टी अशी यांची आगेकूच चालली की काय असं चित्र आहे. एकूणच हा निकाल अनाकलनीय. याची कारणे शोधावी लागतील. महाराष्ट्राच्या जनतेला निकाल मान्य असेल तर कुणीच बोलण्याची गरज नाही. आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी लढत राहू.
November 23, 20244:10 PM IST

CM Eknath Shinde : विरोधक सावत्र भाऊ, महायुतीला बहुमत मिळताच मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात

विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला सावत्र भाऊ असं संबोधलं. ते म्हणाले की, विरोधक सावत्र भाऊ, आमच्या योजनांमध्ये आडकाठी आणतील हे माहिती होती, म्हणून ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे दिले. कागदावर योजना ठेवण्यासाठी आम्ही केल्या नाही.
राज्यात सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काहीतरी करतंय ही भावना निर्माण झाली. जनतेनं विकासाला स्वीकारलं.
November 23, 20243:46 PM IST

Yashomati Thakur : काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना पराभवाचा धक्का

अमरावती : काँग्रेसच्या फायर ब्रँड नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना पराभवाचा धक्का बसला. भाजपचे राजेश वानखडे यांनी यशोमती ठाकूर यांचा पराभव केला. विजयानंतर भाजपचे कार्यकर्ते व राजेश वानखडे यांचा तिवसा येथील पेट्रोल पंप चौकात जल्लोष सुरू आहे.
advertisement
November 23, 20243:45 PM IST

Nagpur Election Result : नागपूरमध्ये कोणत्या मतदारसंघात कुणाचा विजय, पाहा यादी

नागपूर जिल्ह्यातील विधानसभा उमरेड – काँग्रेस , संजय मेश्राम विजय हिंगणा – भाजपा, समीर मेघे विजय काटोल – भाजपा, चरणसिंग ठाकूर विजय सावनेर – भाजपा, आशिष देशमुख विजय रामटेक – (शिवसेना एकनाथ शिंदे) आशिष जैस्वाल विजय पूर्व नागपूर – भाजपा, कृष्णा खोपडे विजय दक्षिण पश्चिम नागपूर – भाजपा, देवेंद्र फडणवीस विजय उत्तर नागपूर – काँग्रे,स, नितीन राऊत विजय
November 23, 20243:14 PM IST

Beed Election Result : बीडमध्ये शरद पवार गटाचा एकमेव उमेदवार विजयी

बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर विजयी झाले आहेत. 5000 पेक्षा जास्त मताधिक्याने त्यांनी विजय मिळवला.ते बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एकमेव विजयी उमेदवार ठरले.
November 23, 20243:01 PM IST

Akola Election Result : अकोल्यात काँग्रेस उमेदवाराकडून पराभव, भाजपने केली फेरमतमोजणीची मागणी

अकोला : अकोला पश्चिम मतदारसंघात भाजपला धक्का बसला आहे. भाजपच्या गडावर काँग्रेसचा झेंडा फडकला असून काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी झाले आहेत. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. भाजपचे विजय अग्रवाल यांचा पराभव झाला आहे. साजिद खान हे 1313 मतांनी विजयी झाल्याने फेर मतमोजणी करण्याची मागणी भाजपने केलीय.
advertisement
November 23, 20242:52 PM IST

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांचा विजय, काँग्रेसच्या आमदाराला चारली धूळ

सांगली  : जत विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार गोपीचंद पडळकर विजयी झाले. काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांचा पडळकर यांनी पराभव केला. तब्बल 35 हजारांचे मताधिक्य घेत पडळकर विजयी झाले.
November 23, 20242:19 PM IST

Jalgaon Election Result : जळगाव जामोदमध्ये भाजपचे संजय कुटे विजयी

जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघ – भाजपचे डॉ संजय कुटे.. 18814 मतांनी विजयी झाले आहेत.
डॉ. संजय कुटे = 106285
डॉ. स्वाती वाकेकर= 87471
November 23, 20242:15 PM IST

Ahilyanagar : 17व्या फेरीअखेर रोहित पवार पिछाडीवर, भाजपचा उमेदवार आघाडीवर

अहिल्यानगर : कर्जत जामखेड मतदार संघात शरद पवार गटाच्या रोहित पवार यांच्याविरोधात भाजपचे राम शिंदे आघाडीवर आहेत. १७ व्या फेरी अखेर राम शिंदे यांनी १०३० मतांची आघाडी मिळवली.
advertisement
November 23, 20242:14 PM IST

Maharashtra Election Result : पिंपरीत तुतारी वाजली पण माझ्या विजयाची, अजितदादांच्या उमेदवारांची शरद पवारांवर टीका

पिंपरी विधानसभा मतदारसंघात तुतारी वाजली पण ती माझ्या विजयाची असं म्हणत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विजय उमेदवार अण्णा बनसोडे यांनी शरद पवार यांच्यावर उपहासात्मक टीका केलीय. आपल्या विजयाचं श्रेय महायुतीच्या नेत्यांचे आणि जनतेच्या विश्वासाचं असल्याचं अण्णा बनसोडे यांनी म्हटलंय. अण्णा बनसोडे तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत.
November 23, 20241:17 PM IST

Amaravati Election Result : माजी मंत्री, अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा पराभव, भाजप उमेदवार विजयी

अमरावीत जिल्ह्यातल्या अचलापूर मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांना पराभवाचा धक्का बसला आहे. १९ व्या फेरीअखेर भाजप उमेदवार प्रवीण तायडे हे २१ हजारांनी आघाडीवर होते.
November 23, 202412:55 PM IST

Maharashtra Election : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षच संकटात, नाना पटोले पिछाडीवर

विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीच्या त्सुनामीत महाविकास आघाडीची धुळदाण उडालीय. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभवाच्या छायेत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पिछाडीवर आहेत. भंडारा जिल्ह्यात साकोली मतदारसंघात भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्णणकर हे नाना पटोलेंविरोधात ५०० मतांनी आघाडीवर आहेत.
advertisement
November 23, 202412:44 PM IST

Maharashtra Election Result : निकालाचं चित्र स्पष्ट होताच शहांचा फडणवीसांना फोन

विधानसभा निकालाचं चित्र स्पष्ट होताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन. अमित शहांनी देवेंद्र फडणवीस यांचं केलं अभिनंदन.
November 23, 202412:42 PM IST

Nashik Election Result : नाशिकमध्ये 8 मतदारसंघात महायुती, भुजबळांना धक्का

नाशिकमध्ये १५ पैकी ८ मतदारसंघातील निकाल जवळपास निश्चित झाले असून विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे. ८ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतलीय. छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ यांना पराभवाचा धक्का बसला. दिलीप बनकर ( राष्ट्रवादी अजित पवार, निफाड )
सुहास कांदे ( शिवसेना शिंदे, नांदगाव )
सीमा हिरे ( भाजपा नाशिक पश्चिम )
माणिकराव कोकाटे ( राष्ट्रवादी अजित पवार, सिन्नर )
दादा भुसे ( शिवसेना शिंदे मालेगाव बाह्य )
दिलीप बोरसे ( भाजपा, बागलाण)
राहुल आहेर ( भाजपा, चांदवड )
सरोज आहेर ( राष्ट्रवादी अजित पवार, देवळाली )
November 23, 202412:34 PM IST

मंत्री दिलीप वळसे पाटलांचा फक्त 400 मतांनी विजय

आंबेगाव विधानसभा मतदार संघातील लढत आत्यंत अटीतटीची झाली असून अटीतटीच्या या लढतीत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे फक्त हजार चारशे मतांच्या मताधिक्याने निवडून आले आहेत.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Election Result 2024 LIVE Updates: अब की बार लाडक्या बहिणींचं सरकार, मुख्यमंत्री कोण होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल