advertisement

Mahashivratri 2026 : महाराष्ट्रातील 400 वर्षांपूर्वीचे मंदिर, महाशिवरात्रीला असतो शिव पार्वतीचा विवाह सोहळा, इतिहास माहितीये का? ‎

Last Updated:

शहरातील भावसिंगपूर या भागांमध्ये प्राचीन असे शिव-पार्वतीचे मंदिर आहे. असे म्हणतात की देशातील हे तिसरेच मंदिर आहे.

+
या'

या' मंदिरात शिवाजी महाराजांनी घेतलं होतं दर्शन, महाशिवरात्रीला असतो 'शिव पार्वती

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक शहर आहे. शहरात ऐतिहासिक वास्तू आहेत, त्याचप्रमाणे शहरामध्ये अनेक अशी ऐतिहासिक मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचे आपले असे वैशिष्ट्य आहे. तसेच शहरात अनेक प्राचीन महादेव मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचे स्वतःचे असे वैशिष्ट्य आहे. शहरातील भावसिंगपूर या भागांमध्ये प्राचीन असे शिव-पार्वतीचे मंदिर आहे. असे म्हणतात की देशातील हे तिसरेच मंदिर आहे. फक्त तीन मंदिरे आहेत, त्यापैकी हे एक मंदिर. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर बारवेत आहे. गणेश लोखंडे यांनी मंदिराविषयी माहिती सांगितलेली आहे.
देशात उज्जैन, त्र्यंबकेश्वर आणि छत्रपती संभाजीनगरतील भावसिंगपुरा या तीन ठिकाणी भगवान शिव-पार्वतीचे समोरासमोर मंदिर आहे. त्यातही भावसिंगपुऱ्यातील मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर सुमारे 20 फूट खोल बारवेत आहे. शिव-पार्वतीच्या दर्शनासाठी 20 ते 25 पायऱ्या खाली उतरावे लागते. सुमारे 400 वर्षांपूर्वीचे हे मंदिर ऐतिहासिक ठेवा आहे. अहिल्याबाई होळकरांनी मंदिराची स्थापना केली होती.
advertisement
भावसिंग राजा असल्यापासून हे मंदिर आहे. शहराच्या पश्चिमेला जुन्या भावसिंगपुऱ्यात सत्येश्वर शिव-पार्वती मंदिर आहे. बारवेत मंदिर आढळत नाही. येथे मोठी बारव असून त्यात शिव व पार्वती निवास करीत आहेत. वरून बारवेत पाहिले की, 50 ते 60 फूट खोलवर पाणी दिसते, मंदिर दिसत नाही. छोट्या दारातून पायऱ्या उतरल्यावर बारवेच्या पूर्व बाजूस व पश्चिम बाजूस भिंतीच्या आत लहान खोली दिसते. पूर्व बाजूस भगवान शिवाची पिंड आहे, तर त्याच्यासमोर पश्चिमेस पार्वतीचे मंदिर आहे. पार्वतीची पूर्वाभिमुख छोटी मूर्ती आहे.
advertisement
येथून आणखी 25 ते 20 पायऱ्या खाली उतरल्यावर उत्तरेस बारवेत पाणी लागते. याच उत्तर बाजूस 50 फूट उंच भिंत आहे. या भिंतीवर हत्ती मोट आहे. या बारवेच्या भिंतीवरच हनुमानाची छोटी मूर्ती आहे. सुमारे 50 फूट खोल व 50 फूट रुंद ही बारव पाहिल्यावर मन प्रसन्न होते. शहरापासून दूर निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे.
advertisement
भावसिंगपुऱ्यातील ज्येष्ठ नागरिक मंदिराविषयी सांगतात की, निझामाच्या सैन्यातील भावसिंग नावाच्या सरदाराने भावसिंगपुरा गाव वसविले. या परिसरात सैनिकांची छावणी उभारली होती. शिवभक्तांसाठी येथील बारवेत शिव-पार्वतीचे मंदिर बांधले. हे 400 वर्षांपूर्वीचे मंदिर मराठवाड्यातील एकमेव आहे. शिव-पार्वतीचा विवाह सोहळा दरवर्षी महाशिवरात्रीच्या वेळेस येथे शिव-पार्वतीचा विवाह सोहळा होतो. त्या दिवशी पहाटे दुग्धाभिषेक, पूजा, आरती करण्यात येते. दिवसभर होमहवन, आरती आणि महाप्रसाद वाटला जातो.
advertisement
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Mahashivratri 2026 : महाराष्ट्रातील 400 वर्षांपूर्वीचे मंदिर, महाशिवरात्रीला असतो शिव पार्वतीचा विवाह सोहळा, इतिहास माहितीये का? ‎
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement