advertisement

आता स्थानकावरील गर्दीचं 'नो टेन्शन'! पुणे रेल्वे स्टेशनचा 'मेकओव्हर', 6 नवे प्लॅटफॉर्म अन् बरंच काही..400 कोटीचा 'मेगाप्लॅन'

Last Updated:

स्थानकाची क्षमता वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मेगा प्लॅन तयार केला आहे. स्थानकावर सहा नवीन प्लॅटफॉर्म उभारले जाणार आहे.

स्थानकावर सहा नवीन प्लॅटफॉर्म उभारले जाणार
स्थानकावर सहा नवीन प्लॅटफॉर्म उभारले जाणार
पुणे: पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, स्थानकाची क्षमता वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मेगा प्लॅन तयार केला आहे. स्थानकावर सहा नवीन प्लॅटफॉर्म उभारले जाणार आहे. यासाठी संपूर्ण 'यार्ड रिमॉडेलिंग'चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी पत्रकार परिषदेत या विकासकामांचा आढावा दिला.
पुणे विभागातील प्रमुख विकासकामे
पुणे स्थानकाची क्षमता वाढवण्यासाठी ६ नवीन फलाट उभारले जात आहेत. यासाठी सुमारे ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हडपसर येथील चौथ्या फलाटाचा विस्तार केला जाणार असून, खडकी आणि हडपसर टर्मिनलच्या विकासासाठी २०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. अमृत भारत स्टेशन योजना, या योजनेअंतर्गत पुणे विभागातील २० स्थानकांचा विकास केला जात आहे. यात लिफ्ट, एस्केलेटर आणि आधुनिक ट्रेन इंडिकेशन बोर्ड बसवले जाणार आहेत.
advertisement
महसूल आणि तिकीट तपासणीत मोठी झेप
गेल्या आर्थिक वर्षात पुणे रेल्वे विभागाने २ हजार २३८ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल गोळा केला आहे. विशेष म्हणजे, तिकीट तपासणी मोहिमेतून रेल्वेला ३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, यात ५७.५ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. तसेच जाहिरातींच्या माध्यमातून १५.६७ कोटींची कमाई झाली आहे.
सुरक्षेसाठी हायटेक यंत्रणा
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुणे स्थानकावर १६० आणि संपूर्ण विभागात ३८२ उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. रेल्वे अपघात रोखण्यासाठी 'कवच' सुरक्षा प्रणालीची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे.
advertisement
पुढील वर्षभरात ही सर्व कामे पूर्ण होणे अपेक्षित असून, त्यानंतर पुणेकरांना विमानतळाप्रमाणेच रेल्वे स्थानकावरही जागतिक दर्जाच्या सुविधा मिळतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
आता स्थानकावरील गर्दीचं 'नो टेन्शन'! पुणे रेल्वे स्टेशनचा 'मेकओव्हर', 6 नवे प्लॅटफॉर्म अन् बरंच काही..400 कोटीचा 'मेगाप्लॅन'
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement