Healthy Breakfast : रोज सकाळी 'हा' खास नाश्ता करा, 80 व्या वर्षापर्यंत तंदुरुस्त राहतील हाडं! सोपी आहे रेसिपी
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
आज आम्ही तुम्हाला नाश्त्याचा असा पदार्थ सांगत आहोत, जो तुम्ही रोज सकाळी खाल्लात तर वृध्दापकाळापर्यंत तुमची हाडं तंदुरुस्त राहतील.
मुंबई : रोज सकाळी आपण काही ना काही नाश्ता करतोच, त्याशिवाय घराबाहेर पडत नाही आणि खरं तर पडूही नये. सकाळचा नाश्ता स्किप केल्याने आपल्या आरोग्याला अनेकप्रकारे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच रोज नाश्ता करावा. आज आम्ही तुम्हाला नाश्त्याचा असा पदार्थ सांगत आहोत, जो तुम्ही रोज सकाळी खाल्लात तर वृध्दापकाळापर्यंत तुमची हाडं तंदुरुस्त राहतील.
रांचीमध्ये अनेक लोक रोज हा नाश्ता करतात. 80 वर्षांचे वीरेंद्र यांनी सांगितलं की, 'आम्ही पिठोरियामध्ये राहतो आणि आम्ही सकाळी उकडलेले चणे खातो. पण आम्ही ते तसेच खात नाही. आमच्याकडे असलेल्या दुधाचे आम्ही पनीर बनवतो आणि थोडे शेंगदाणेही घालतो.' ही खास रेसिपी आहे, एका हाय प्रोटीन सॅलडची.
असं बनवा हाडं मजबूत करणारं सॅलड..
- हे सॅलड वेगळं आणि खूप खास आहे. यामध्ये उकडलेले चणे, उकडलेले शेंगदाणे, घरी बनवलेले पनीर, मखाना पावडर आणि मोड आलेली मुगडाळ वापरली जाते. यामध्ये काळं मीठ, लिंबाचा रस, थोडा चाट मसालाही टाकतात.
advertisement
- मखाना घरी चांगला भाजून मग मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्या. पावडर केल्यामुळे मखाना खायला सोपा होतो आणि सॅलडची चवही वाढते. तुम्ही यामध्ये टोमॅटो, कांदे आणि काकडीही घालू शकता.
- हे सॅलड लोह, प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. यामुळे शरीरात कॅल्शियम आणि आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता भासत नाही आणि हाडं मजबूत होतात.
advertisement
या सर्व साहित्यामुळे हा एक प्रोटीन रिच नाश्ता बनतो. वीरेंद्र यांनी सांगितलं की, 'ते वयाच्या 80 व्या वर्षी पाच पडले. मात्र त्यांच्या हाडांना काहीही दुखापत झाली नाही. गेल्या 10 वर्षांपासून ते हा नाश्ता करत असल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.' ते पुढे म्हणाले की, 'रोज हे सॅलड नसतं तर माझी हाडं इतकी मजबूत राहिली नसती. परिसरातील लोकांनाही हा नाश्ता आवडतो.'
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 6:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Healthy Breakfast : रोज सकाळी 'हा' खास नाश्ता करा, 80 व्या वर्षापर्यंत तंदुरुस्त राहतील हाडं! सोपी आहे रेसिपी







