IPL 2026 : घरच्या मैदानावर ऋतुराजचा अंदाज चुकला, मॅचनंतर पराभवाच कारण काय सांगितलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
या पराभवाला अनेक कारणे जबाबदार आहेत. पण सर्वात मोठं कारण ठरलंय ते म्हणजे कॅप्टन ऋतुराज गायकवाड घरच्या मैदानातच अंदाज चुकला आहे.त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचा पराभव झाल्याचे तो सांगतो.
IPL 2026 : आयपीएलमध्ये आजच्या सामन्यात 209 धावांचं लक्ष देऊनही चेन्नई सूपर किंग्जचा पराभव झाला आहे. आणि पंजाब किंग्जने हा सामना 5 विकेटने जिंकला आहे. या पराभवाला अनेक कारणे जबाबदार आहेत. पण सर्वात मोठं कारण ठरलंय ते म्हणजे कॅप्टन ऋतुराज गायकवाड घरच्या मैदानातच अंदाज चुकला आहे.त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचा पराभव झाल्याचे तो सांगतो.
मॅचनंतर बोलताना कॅप्टन ऋतुराज गायकवाडने पराभवाच कारण सांगितल आहे. यावेळी बोलताना तो म्हणाला की, मला वाटतं की ही एक खूप चांगली धावसंख्या होती. हो, खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी चांगली होती, पण मला वाटलं की फिरकी गोलंदाजांसाठी ती थोडी पकड घेत होती. याचाच अर्थ पिच रिपोर्टच गायकवाड चुकीचा समजला आणि त्याची रणनिती फसली.
advertisement
राहुलच्या इम्पॅक्टवर बोलताना ऋतुराज म्हणाला,हो, आम्हाला वाटलं की आम्ही तीन वेगवान गोलंदाजांना संधी दिली होती, आणि अर्थातच, विशेषतः पॉवरप्लेनंतर मधल्या षटकांमध्ये, दोन चांगले मनगटी फिरकी गोलंदाज एकत्र गोलंदाजी करत होते. आम्हाला वाटलं की, त्याचा फायदा होईल. पण मला वाटतं, त्या दोघांचाही दिवस थोडा खराब होता, आणि मला वाटतं की त्यामुळेच आम्हाला फटका बसला.
advertisement
मला वाटतं एक वेळ अशी आली होती की धावसंख्या प्रति षटक 11 पर्यंत पोहोचली होती आणि त्यानंतर कदाचित एक-दोन चांगली षटकं झाली. ती १२ आणि १३ पर्यंत गेली असती. अशा प्रकारेच तुम्ही गती मिळवता. त्यामुळे मला वाटतं की मधल्या षटकांमध्ये आम्हाला ती गती मिळाली नाही. हे नक्कीच एक कठीण आव्हान आहे, पण जसं मी म्हणालो, अनेक सकारात्मक गोष्टी आहेत.
advertisement
फलंदाजी खूप चांगली झाली. आयुषने शानदार फलंदाजी केली. तो संघात असणं, त्याच्यामुळे हंगामात पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास मिळणं महत्त्वाचं आहे आणि शिवमही खूप चांगली फलंदाजी केली. त्यामुळे हो, फलंदाजीच्या बाबतीत आमचा आत्मविश्वास चांगला होता. गोलंदाजीबद्दल बोलायचं झाल्यास, हो, नक्कीच खूप सुधारणा करायची आहे. मला बरं वाटतंय. संघासाठी जी काही भूमिका आवश्यक आहे, तिच्याशी जुळवून घ्यायचं आहे. आज मला वाटलं की खेळपट्टी थोडी पकड घेत असल्यामुळे थोडा वेळ खेळपट्टीवर टिकून राहावं. त्यामुळे मला वाटलं की, स्थिरावलेला फलंदाज आयुष खूप चांगली फलंदाजी करत होता. म्हणून मी विचार केला की थोडा वेळ धीर धरावा आणि त्यानंतर फायदा उचलता येईल. पण दुर्दैवाने मी चुकीच्या वेळी बाहेर पडलो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 11:58 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : घरच्या मैदानावर ऋतुराजचा अंदाज चुकला, मॅचनंतर पराभवाच कारण काय सांगितलं?







