advertisement

Nashik: नाशिकमध्ये 'खरात पॅटर्न 2' प्रकरणी मोठी कारवाई, नराधमाविरोधात पहिला गुन्हा दाखल, 121 व्हिडीओ असल्याचं समोर

Last Updated:

व्यावसायिकाच्या टॅबमध्ये शंभरहून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले होते.  पोलिसांनी या प्रकरणी पीडित महिलांना आव्हान केलं होतं.

News18
News18
नाशिक: बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेल्या नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. दररोज या प्रकरणात नव नवीन खुलासे होत आहे. अशातच नाशिकमधून आणखी एक प्रकरण समोर आलं आहे.  सातपूर परिसरातील नराधमाने नोकरीचं आमिष देऊन पीडित महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अखेरीस या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल केला आहे.
नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एका व्यावसायिकाचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून 12 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चार जणांना नाशिकच्या सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे. या व्यावसायिकाच्या टॅबमध्ये शंभरहून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले होते.  पोलिसांनी या प्रकरणी पीडित महिलांना आव्हान केलं होतं. त्यानंतर सातपूर पोलीस स्टेशनमध्ये पहिला गुन्हा दाखल झाला आहे. रवींद्र एरंडे (वय 63) असं नराधमाचं नाव आहे.   गरजू महिलांचे आक्षेपार्य व्हिडिओ बनवून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या या व्यावसायिका विरोधातच पीडित महिलेकडून पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
advertisement
4 मोबाईल, 2 पेनड्राईव्ह तसंच 1 मेमरी कार्ड आणि 121 व्हिडीओ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  दिनांक ०२ एप्रिल २०२६ रोजी सातपूर पोलीस स्टेशन इथं एका ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलीस स्टेशनमध्ये गुरनं. ४२७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३०८ (२,३) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात आतापर्यंत एकूण ०४ आरोपी अटक करण्यात आले असून त्यांना आज रोजी न्यायालयात हजर केले असता  न्यायालयाने दिनांक ०७/०४/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचे तपासात अटक आरोपीत मजकूर यांच्या ताब्यातून एकूण ०४ मोबाईल, ०२ पेनड्राईव्ह तसंच ०१ मेमरी कार्ड पोलिसांनी तपासाकामी हस्तगत केले असून त्याची पडताळणी केली असता त्यामध्ये नमूद गुन्ह्यातील फिर्यादीच्या विविध महिला/मैत्रिणींचे अश्लील व्हिडीओ चित्रण केले आहे. एकूण १२१ व्हिडीओ क्लिप्स असल्याचं आढळून आलं आहे.
advertisement
नोकरीचं आमिष देऊन अत्याचार
आरोपीचं नाव  रवींद्र गणपत एरंडे ( वय ६३)  आहे. हा नराधम सातपूर इथचं राहणार आहे. पीडितेनं सातपूर पोलीस स्टेशन इथं संपर्क साधून संशयीत रविंद्र एरंडे याच्याविरोधात तक्रार दिली आहे.   एरंडेनं पीडित महिलेच्या मुलास सरकारी नोकरी लावून देतो तसंच पीडित महिलाचा गैरफायदा घेऊन पीडित महिलेला 'तुमचं भविष्य उज्ज्वल करून देतो' असं आमिष दाखवून  तिच्यावर नाशिक तसंच इगतपुरी परिसरातील विविध हॉटेलवर घेऊन जाऊन वारंवार लैंगिक शोषण केलं. आता खंडणी प्रकरणातील फिर्यादी संशयीत रविंद्र एकनाथ एरंडे याच्या विरुद्ध सातपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रवींद्र एरंडेलाा अटक करण्यात आली आहे.
advertisement
पोलिसांचं पीडित महिलांना केलं आवाहन
आरोपी रवींद्र एरंडे याने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं व्हिडीओमधून समोर आलं आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी पीडितांना आवाहन केलं आहे.  एरंडेच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास त्यांनी सातपूर पोलीस स्टेशन तसंच खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. तक्रारदार यांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.
या क्रमांकावर संपर्क करावा
१) सचिन बारी साो, सहा पोलीस आयुक्त अंबड विभाग - मो. ९०४९८७२८२२
advertisement
२) प्रकाश अहिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपूर पो.स्टे. मो. ९८२३२३४१७६
३) स्वप्नाली पलांडे, सहा पोलीस निरीक्षक मो. ७७७४००२७१०
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik: नाशिकमध्ये 'खरात पॅटर्न 2' प्रकरणी मोठी कारवाई, नराधमाविरोधात पहिला गुन्हा दाखल, 121 व्हिडीओ असल्याचं समोर
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement