advertisement

VIDEO : PSLचा खतरनाक कारनामा, 1 बॉलमध्ये काढल्या 14 धावा, बिग बॅश, आयपीएलला जमलं नाही ते करून दाखवलं

Last Updated:

खरं तर पाकिस्तानी सूपर लीगमध्ये आज लाहोर कलंदर आणि मुलतान सुलतान यांच्यात सामना सूरू आहे. हा सामना पावसामुळे 13 ओव्हरचा करण्यात आला होता.

psl 2026 muhammad Ismail
psl 2026 muhammad Ismail
Pakistan Super league : पाकिस्तान सूपर लीगमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका बॉलवर जवळ जवळ 14 धावा काढण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे ही घटना पाहून ही गोष्ट फक्त पीएसललाच जमू शकते,असेही बोलले जात आहेत.त्यामुळे नेमक्या 1 बॉलवर 14 धावा कशा आल्या? हे जाणून घेऊयात.
खरं तर पाकिस्तानी सूपर लीगमध्ये आज लाहोर कलंदर आणि मुलतान सुलतान यांच्यात सामना सूरू आहे. हा सामना पावसामुळे 13 ओव्हरचा करण्यात आला होता. त्यामुळे या सामन्यात लाहोर कलंदरने 5 विकेट गमावून 185 धावांची खेळी केली आहे.
लाहोरने कलंदरकडून या सामन्यात मोहम्मद नसीम आणि परवेज होसेनने चांगली सूरूवात केली होती. मोहम्मद नसीमने यावेळी 28 बॉलमध्ये 60 धावांची खेळी केली. त्यानंतर परवेज होसनने 19 बॉलमध्ये 45 धावा केल्या. यासह अब्दुल शाफाकच्या 14 बॉलमध्ये 33 धावा. या बळावर लाहोर कलंदरने 5 विकेट गमावून 185 धावांची खेळी केली होती.मुलतान सुलतानीकडून यावेळी मुहम्मद ईस्माईलने 2 तर पीटर सीडल आणि फैसल अक्रमने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली होती.
advertisement
या सामन्यात मुल्तान सुल्तानकडून मुहम्मद इस्माईल गोलंदाजीसाठी आला होता.यावेळी मुहम्मदने पहिला बॉलट वाईड टाकला आणि किपरच्या हातून देखील बॉल गेल्याने एक ही बॉल न टाकता 5 धावा झाल्या होत्या. त्यानंतर टाकलेल्या बॉलवर मोहम्मद नईमने चौकार मारला.अशाप्रकारे एका बॉलवर 9 धावा झाल्या.त्यानंतर इस्माईल पुन्हा वाईड बॉल टाकला आणि तो चौकार झाला.त्यामुळे पुन्हा 5 धावा मिळाल्या. अशाप्रकारे एका बॉलवर 14 धावा झाल्या. या गोलंदाजीमुळे पाकिस्तानची इज्जत गेली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : PSLचा खतरनाक कारनामा, 1 बॉलमध्ये काढल्या 14 धावा, बिग बॅश, आयपीएलला जमलं नाही ते करून दाखवलं
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement