Snake : घराभोवती असलेल्या 'या' 5 गोष्टी सापांना देतात आमंत्रण, आत्ताच ओळखून करा दूर, म्हणजे टळेल धोका
- Published by:Devika Shinde
Last Updated:
गावाकडच्या भागात साप सहसा जास्त दिसतात, खरंतर आपल्या नकळत आपणच सापांना आमंत्रण दिलेलं असतं. त्यामुळे तो आकर्षित होतात. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचं असेल, तर आजच तपासा की तुमच्या घराभोवती 'या' 5 गोष्टी तर नाहीत ना.
पावसाळा असो किंवा कडक उन्हाळा, घराच्या बागेत किंवा अंगणात फेरफटका मारताना अचानक सळसळ ऐकू आली की काळजाचा ठोका चुकतो. जगात असा क्वचितच कोणी असेल ज्याला सापाची भीती वाटत नाही. सापाचं विष मानवी मज्जासंस्थेवर इतक्या वेगाने हल्ला करतं की, काही मिनिटांतच मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळेच लोक सापाला घाबरतात. साप सरपटणारा प्राणी असल्याने तो कुठेही सहज लपून बसतो आणि आपल्याला त्याचा पत्ताही लागत नाही आणि एखाद्याला संपवायला त्याचा काही सेकंदाचा दंश देखील पुरेसा आहे.
advertisement
advertisement
1. बागेतील पाण्याचे साठे आणि कमळाची झाडंअनेकांना आपल्या बागेत छोटे तलाव किंवा कारंजे ठेवायला आवडतं. पण हे साचलेलं पाणी बेडूक आणि कीटकांना आकर्षित करतं, जे सापांचं मुख्य अन्न आहे. विशेषतः बागेतील कुंड्यांमध्ये किंवा तळ्यात असलेली कमळ (Lotus) किंवा लिलीची झाडं सापांना खूप आवडतात. या झाडांच्या कोमल देठांमध्ये आणि पाण्याच्या थंडाव्यात साप तासनतास लपून राहू शकतात.
advertisement
advertisement
3. दाट झुडपं आणि लांब गवतघराभोवती वाढलेलं लांब गवत आणि काटेरी झुडपं म्हणजे सापांचं हक्काचं घर. या झुडपांमध्ये उंदीर, लहान पक्षी आणि कीटक सहज सापडतात, जे सापांचं भक्ष्य आहेत. जर तुमच्या घराभोवती गवत खूप वाढलं असेल, तर तिथे उंदीर असण्याची शक्यता जास्त असते आणि जिथे उंदीर तिथे साप हे समीकरण ठरलेलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
काय काळजी घ्याल?घराभोवतीचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. पालापाचोळा साचू देऊ नका.बागेतील गवत नियमितपणे ट्रिम करा जेणेकरून सापांना लपायला जागा उरणार नाही.साचलेलं पाणी काढून टाका किंवा ते वाहते राहील याची काळजी घ्या.घराच्या भिंतींना किंवा जमिनीला असलेल्या फटी सिमेंटने बुजवून घ्या, जेणेकरून साप आत शिरणार नाहीत.
advertisement






