advertisement

Central Railway News: एल्फिस्टन पूलाच्या कामामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर होणार परिणाम? या वेळेमध्ये जम्बो ब्लॉक

Last Updated:

मध्य रेल्वेवर मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. स्टेशनच्या विस्तारिकरणासाठी आणि एल्फिस्टन पुलाच्या कामामुळे मध्य रेल्वेवर काही तासांसाठी विशेष मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

News18
News18
मुंबई: मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवर शनिवार आणि रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. स्टेशनच्या विस्तारिकरणासाठी आणि एल्फिस्टन पुलाच्या कामामुळे मध्य रेल्वेवर काही तासांसाठी विशेष मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे नोकरदारांना मेगाब्लॉकचं टाईमटेबल पाहूनच ऑफिसमधून निघावं लागणार आहे. मध्य रेल्वेवरील कोणकोणत्या रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार जाऊन घेऊया...
दरम्यान, मध्य रेल्वेकडून ठाणे आणि डोंबिवली स्थानकादरम्यान प्लॅटफॉर्म विस्तारिकरणासाठी आणि एल्फिस्टन पुलाचे पाडण्याचे काम पूर्ण करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यासह इतरही काही कामांसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉकची घोषणा केली आहे. मुंबई सीएसएमटी ते दादर स्थानकादरम्यानची उपनगरीय सेवा 4 एप्रिल रोजी रात्री 10:30 ते 5 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळामध्ये, एल्फिस्टन पुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान, ठाणे आणि डोंबिवली दरम्यानची सेवा देखील अधूनमधून रद्द करण्यात येणार आहे. तर, काही लोकलच्या फेऱ्यांमध्येही बदल केला जाणार आहे.
advertisement
सीएसएमटी आणि परळ स्थानकाऐवजी लोकल दादर आणि कुर्ला यांसारख्या पर्यायी स्थानकांवरून चालवल्या जाणार आहेत. मेगाब्लॉकच्या काळामध्ये, स्लो लोकल ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत. स्लो लोकल्स कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान, कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवरच थांबणार आहेत. मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांना लोकल सेवा 15 मिनिटे उशिरा उपलब्ध असणार आहेत. त्याप्रमाणेच प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे. दरम्यान, रात्रकालीन मेगाब्लॉकचा फटका फक्त लोकललाच बसणार नसून लांबपल्ल्याच्या एक्सप्रेसला सुद्धा बसणार आहे. अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्या ठाणे, दादर, पनवेल सारख्या स्थानकावरून सोडल्या जाणार आहेत.
advertisement
त्यांचे वेळापत्रक प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या आधी काही वेळ अपडेट केले जाणार आहे. जनशताब्दी, तेजस, मांडवी आणि कोकण कन्या एक्सप्रेस यांसारख्या एक्सप्रेस सीएसएमटी ऐवजी पनवेल, ठाणे किंवा दादर येथून सुरू सुटणार आणि त्यांचं शेवटचं स्टेशन सुद्धा तेच असणार आहे. शिवाय, एक्सप्रेससह अनेक सुपरफास्ट एक्सप्रेस आणि वंदे भारत एक्सप्रेस सुद्धा काही मिनिटे उशीराने धावणार आहे. तर तुतारी एक्सप्रेससारख्या इतर गाड्यांच्या वेळापत्रकातही मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे. मार्गावर येणाऱ्या काही गाड्यांचेही नियमन केले जाईल, ज्यामुळे प्रवाशांना आणखी विलंब होईल. दरम्यान, रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे की, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, प्रवाशांची सुरक्षा आणि क्षमता वाढवण्यासाठी हे विशेष ब्लॉक्स घेणं आवश्यक आहे.
advertisement
यामुळे, मुंबईतील रोजच्या प्रवाशांना वीकेंडच्या वेळी प्रवासाला जास्त वेळ लागण्याची, लोकल उशिरा असल्यामुळे प्रवाशांची गर्दी होण्याची आणि शेवटच्या क्षणी लोकलच्या फेऱ्यांमध्ये बदल होण्याची सुद्धा शक्यता आहे. प्रवाशांना रेल्वेचे वेळापत्रक आधीच तपासून त्याप्रमाणे आपल्या प्रवासाचे नियोजन करण्याचा सल्ला मध्य रेल्वेकडून देण्यात आला आहे. एकाच वेळी अनेक मार्गांवर परिणाम झाल्यामुळे, याचा परिणाम शहराच्या संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Central Railway News: एल्फिस्टन पूलाच्या कामामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर होणार परिणाम? या वेळेमध्ये जम्बो ब्लॉक
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement