advertisement

IAS Transferred: राज्यातील २४ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या जिल्ह्यात कोण कलेक्टर, कोण ZP CEO?

Last Updated:

Maharashtra IAS Transferred: आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच २४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
मुंबई : भारताचे निबंधक महासंचालक आणि जनगणना आयुक्तांच्या आदेशानुसार राज्यातील २४ आयएएस अधिकाऱ्यांची बदल्या करण्यात आलेल्या आहेत. गुरूवारी रात्री भारतीय प्रशासकीय सेवेतील राज्यातील २४ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. केंद्रीय कार्मिक मंत्रालयानेही या बदल्या करण्यास मान्यता दिली होती.
बदली करण्यात आलेल्या बहुतेक आयएएस अधिकाऱ्यांची जनगणना कार्यक्रमात त्या-त्या जिल्ह्यात वा शहरात महत्त्वाची भूमिका असणार आहे. या सगळ्या अधिकाऱ्यांना लवकरच जनगणनेच्या प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार आहे. जनगणनेचे काम दीड-दोन वर्षे चालणार आहे. या बदल्यांमध्ये पशुसंवर्धन आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

कोणत्या जिल्ह्यात कोण जिल्हाधिकारी?

प्रवीणकुमार देवरे- बुलढाणा जिल्हाधिकारीपदी
advertisement
भारत बाष्टेवाड- लातूरला जिल्हाधिकारी
महेश गोंदावले- गोंदिया जिल्हाधिकारीपदी
विजय राठोड- कोल्हापूर जिल्हाधिकारी
वसुमना पंत- चंद्रपूर जिल्हाधिकारीपदी
कार्तिकेयन- सोलापूर जिल्हाधिकारीपदी
कुमार आशीर्वाद- नागपूर जिल्हाधिकारीपदी

कोणत्या जिल्ह्यात कोण ZP मुख्य कार्यकारी अधिकारी?

मिन्नू पी. एम. यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली
कृष्णकांत कनवारीया जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली
advertisement
सत्यम गांधी अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली
डॉ. जास्मिन यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली
के. मंजुलक्ष्मी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्तपदी

कोणत्या महापालिकेचे कोण आयुक्त?

प्राजीत नायर- पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त
अमोल येडगे- छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त
वर्षा लढ्ढाज अमरावती महापलिका आयुक्त
राजेंद्र भारुड- कोल्हापूर महापालिका आयुक्त
advertisement
मोहपात्रा सांगली-मिरज-कुपवाड महापालिका आयुक्त
अंकित- नागपूर महापालिका अतिरिक्त आयुक्त
अंजली शर्मा जालना महापालिका आयुक्त

पशुसंवर्धन, रोजगार हमी योजना, जलजीवन मिशन, बियाणे महामंडळावर कोणाची वर्णी?

किरण पाटील- पशुसंवर्धन आयुक्तपदी
दीपक सिंग- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आयुक्त
वर्षा ठाकूर-घुगे- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी
जी. श्रीकांत- जलजीवन मिशनच्या संचालक
advertisement
दिलीप स्वामी- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IAS Transferred: राज्यातील २४ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या जिल्ह्यात कोण कलेक्टर, कोण ZP CEO?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement