advertisement

Kalyan News: वारंवार अपघात होणाऱ्या गांधारी पुलावर तरूणांकडून विचित्र स्टंटबाजी, प्रकार पाहून कल्याणकर संतापले

Last Updated:

कल्याण पश्चिममधील गांधारी परिसरातील रिंग रोडवरील काही उनाड तरूणांचा व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओ पाहून कल्याणकरांकडून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

News18
News18
कल्याण: कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरातील नागरिकांचे रेसिंग करणाऱ्या तरूणांमुळे जीव धोक्यात आला आहे. गांधारी पुलाजवळ अनेक नागरिक सकाळी आणि संध्याकाळी फेर फटका मारण्यासाठी, रात्री शत पावली करण्यासाठी येत असतात. पण ते सुद्धा आता बाईकर्स मुळे येणं बंद झाले आहेत. गांधारी पुलावर अनेक तरूण दररोज रेसिंगसाठी येत असतात. या रेसिंगमुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच सध्या गांधारी पुलावरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते उनाड तरूण कशा पद्धतीने बाईक चालवत आहेत, हे आपल्याला पाहयाला मिळत आहे.
व्हिडिओ पाहिल्यानंतर, सहाजिकच पहिला प्रश्न तरुणांच्या दुचाकीच्या विचित्र स्टंटबाजीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी, गांधारी पूलावर शतपावली करण्यासाठी आलेल्या काही नागरिकांचा बाईक रेसरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ती घटना ताजी असताना आता अशातच पुन्हा एकदा सोशल मीडियावर पुलावर कशापद्धतीने स्टंटबाजी केली जात आहे, याचा व्हिडिओ समोर आला आहे. जीवघेणे स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकी स्वारांवर कल्याण वाहतूक पोलि‍सांकडून तात्पुरती कारवाई केली जाते. त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती पाहायला मिळते. यामुळे गांधारी परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
advertisement
दरम्यान, गांधारी पुलावरील व्हायरल व्हिडिओ गुरूवारी रात्री शूट करण्यात आलेला आहे. सध्या हा बाईक रेसिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कायमच प्रवाशांकडून या उनाड स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकी स्वारांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी कल्याणकरांकडून केली जात आहे. स्टंटबाजी करत असताना या बाईकस्वारांच्या बाईकच्या स्पीडला सुद्धा काही लिमिट नसल्याचंही पाहायला मिळत आहे. आपण कुठे बाईक चालवतोय आणि कुठे नाही, याचं सर्व भान विसरून हे दुचाकी स्वार बाईक चालवत असतात. त्यांच्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा जीव जातो.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Kalyan News: वारंवार अपघात होणाऱ्या गांधारी पुलावर तरूणांकडून विचित्र स्टंटबाजी, प्रकार पाहून कल्याणकर संतापले
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement