advertisement

जीभेवर वारंवार फोड येतायत? केवळ उष्णता म्हणून दुर्लक्ष करू नका; असू शकतं 'या' गंभीर आजारांचं लक्षण

Last Updated:

तुमची जीभ केवळ चव सांगत नाही, तर तुमच्या शरीरात आत काहीतरी गडबड सुरू आहे, याचे संकेतही देत असते. चला तर मग, जीभेवरील येणाऱ्या तोंडामागचं नेमकं विज्ञान आणि धोक्याच्या सूचना समजून घेऊया.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : सकाळी उठल्यावर गरम चहाचा एक घोट घेताना किंवा आवडीचा मसालेदार पदार्थ खाताना अचानक जीभेची आग होऊ लागली की लक्षात येतं, अरे बापरे! जीभेवर फोड आलाय. ज्याला आपण तोंड येणं देखील म्हणतो. अशावेळी आपण माणतो ती उष्णता जास्त झाली असेल आणि एखादं घरगुती औषध लावून शांत बसतो. जीभेवर फोड येणं ही एक अत्यंत सामान्य समस्या वाटत असली, तरी ती किती त्रासदायक असते हे ज्याला अनुभव आलाय त्यालाच ठाऊक, नीट बोलता येत नाही की आवडीचं जेवण जेवता येत नाही.
साधारणपणे हे फोड काही दिवसांत आपोआप बरे होतात. पण जर तुम्हाला ही समस्या वारंवार होत असेल किंवा एखादा फोड बराच काळ टिकून असेल, तर मात्र सावध होण्याची गरज आहे. तुमची जीभ केवळ चव सांगत नाही, तर तुमच्या शरीरात आत काहीतरी गडबड सुरू आहे, याचे संकेतही देत असते. चला तर मग, जीभेवरील येणाऱ्या तोंडामागचं नेमकं विज्ञान आणि धोक्याच्या सूचना समजून घेऊया.
advertisement
नेमकी कारणं काय असू शकतात?
जीभेवर फोड येण्यामागे अनेक साधी कारणं असतात
शरीरात व्हिटॅमिन बी-12 आणि व्हिटॅमिन सी ची कमतरता असल्यास तोंडात किंवा जीभेवर वारंवार फोड येतात.
जर तुमचं पोट साफ नसेल किंवा अपचनाचा त्रास असेल, तर त्याचे परिणाम जीभेवर दिसू लागतात.
अतिशय तिखट, मसालेदार किंवा कडक गरम अन्न खाल्ल्याने जीभेचा नाजूक थर पोळतो. तसेच, जेवताना चुकून जीभ दातात चावली गेल्यामुळेही जखम होते.
advertisement
वाढता मानसिक ताण आणि महिलांमध्ये होणारे हार्मोनल बदल हे देखील फोडांचे कारण ठरू शकतात.
वारंवार येणारे फोड 'या' आजारांचे लक्षण असू शकतात
लेडी हार्डिंग हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉ. एल. एच. घोटेकर यांच्या मते, जर हे फोड 10-15 दिवसांत बरे होत नसतील, तर ते केवळ उष्णतेचं लक्षण नाही.
1. रोगप्रतिकारशक्ती : तुमची इम्युनिटी कमकुवत झाली असल्यास शरीराला संसर्गाशी लढता येत नाही, ज्यामुळे फोड वारंवार येतात.
advertisement
2. संसर्ग : काही वेळा हे बॅक्टेरिअल किंवा फंगल इन्फेक्शनचे संकेत असू शकतात.
3. गंभीर आजार: जर फोडातून रक्त येत असेल, प्रचंड वेदना होत असतील किंवा फोडाची जागा कडक झाली असेल, तर ते तोंडाच्या कर्करोगासारख्या गंभीर स्थितीचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
बचावासाठी काय कराल?
हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश करा. पुरेसं पाणी प्या जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहील.
advertisement
तोंडाची स्वच्छता महत्त्वाची आहे. दिवसातून दोनदा ब्रश करा आणि जीभ नीट साफ ठेवा.
तंबाखू, सुपारी आणि अल्कोहोलमुळे तोंडातील पेशींना इजा पोहोचते, त्यामुळे या गोष्टी टाळणेच हिताचे आहे.
डॉक्टरांकडे कधी जावे?
पुढील लक्षणे दिसल्यास घरगुती उपाय करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे:
जर फोड 15 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून असेल.
छाल्यांसोबत ताप येत असेल.
advertisement
फोडातून रक्त येत असेल किंवा जखम वाढत असेल.
गिळताना किंवा बोलताना असह्य वेदना होत असतील.
जीभ हा आपल्या शरीराचा आरसा आहे. त्यावर येणारे फोड तुम्हाला शरीराच्या आतील आरोग्याबद्दल सांगत असतात. त्यामुळे त्यांना केवळ साधी उष्णता म्हणून सोडून देऊ नका, तर आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्या.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
जीभेवर वारंवार फोड येतायत? केवळ उष्णता म्हणून दुर्लक्ष करू नका; असू शकतं 'या' गंभीर आजारांचं लक्षण
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement