शिवाजी महाराजांचा पुतळा बसण्यावरून अंजनगावात पुन्हा तणाव, खेलोबा मंदिर परिसरात तरुणाने दगड फेकला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा हे गाव सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्थापनेमुळे चर्चेत आले आहे.
विरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी, सोलापूर (माढा) : माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा बसण्यावरून दोन समाजामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा गावात तणाव निर्माण झाला असून खेलोबा मंदिर परिसरात एका तरुणाने दगड फेकले. संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा हे गाव सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्थापनेमुळे चर्चेत आले आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक अतिशय गुण्या गोविंदाने राहत असलेल्या या गावात गेल्या दोन चार दिलसांपासून तणावाचे वातावरण आहे. पुतळा बसविण्यावरून धनगर आणि मराठा समाज आमनेसामने आला असून मोठा तणाव निर्माण झाला आहे.
advertisement
दुसरीकडे ज्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तो तरुण आपण दगड फेकला नाही, असे स्पष्टपणे सांगत आहे. मी काहीही गुन्हा केला नाही. मी फक्त व्हिडीओ काढत होतो, असे संबंधित तरुण व्हिडीओत स्पष्टपणे म्हणत असल्याचे दिसते.
अंजनगावात वाद का सुरू आहे?
अंजनगाव खेलोबा गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा बसविला जाणार आहे. मात्र ज्या जागेवर हा पुतळा बसवायचा आहे, त्या जागेचा वाद आहे. नेमकी जागा कुणाची, यावरून दोन्ही समाजात मतभेद आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुतळा स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून आंदोलनाचा प्रयत्न केला. गावात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
advertisement
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, माढ्याचे तहसीलदार, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील गावकऱ्यांशी बोलून चर्चेतून मार्ग काढत आहेत. दरम्यान, दोन्ही गटात वाद होऊन तहसीलदारांची गाडी उलथवून टाकण्यापर्यंत लोकांची मजल गेली होती.सध्या अंजनगावमध्ये तणावाची परिस्थिती असून पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 9:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिवाजी महाराजांचा पुतळा बसण्यावरून अंजनगावात पुन्हा तणाव, खेलोबा मंदिर परिसरात तरुणाने दगड फेकला








