बर्फासारखी गार होईल Car! कुलिंग होत नसेल तर फक्त करा एवढंच काम, 99 टक्के लोक करता ही चूक!
- Published by:Sachin S
Last Updated:
बऱ्याच वेळा कार कुलिंग करण्याच्या नादात एसीच बंद पडतो. असं बऱ्याच जणांसोबत होतं. पण, त्याची काही कारणं आहे.
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्यामुळे या दिवसांमध्ये प्रवास करणे कठीण झालं आहे. अशावेळी कारमध्ये गारेगार प्रवास करण्याकडे सगळ्यांचा कल असतो. जर तुमच्याकडे कार असेल तर थंडगार प्रवास करू शकतात. पण, बऱ्याच वेळा कार कुलिंग करण्याच्या नादात एसीच बंद पडतो. असं बऱ्याच जणांसोबत होतो. पण, त्याची काही कारणं आहे. जी सगळ्यांना माहिती नाही. अशावेळी दुरुस्ती करण्यासाठी गेला तर मॅकानिक अतिरिक्त खर्च आकारतो. त्यामुळे थोडी काळजी घेतली तर हा खर्च वाचू शकतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बऱ्याचवेळा एसी रिपिअर करणारे मॅकेनिक हे कुलिंग होत नसेल तर कम्प्रेसर खराब झाला असं सांगतात. याचा खर्च हा १० ते २० हजारांपर्यंत असतो. कम्प्रेसर बदलून घ्या, असं सांगतात. पण, अशी वेळ आली तर दुसऱ्या एखाद्या एसी रिपिअर करणाऱ्या मॅकेनिक करून एसी दाखवून घ्या. बऱ्याच वेळा एसी फिल्टर (Cabin Filter) खराब झाल्यावर किंवा कंडेंसरवर माती लागली तर कुलिंग कमी होतं.
advertisement
advertisement







