IPL 2026 : एक मेसेज घरी दोन तासाची भेट, हिटमॅनने बदललं करिअर, रोहितबाबत बोलताना भावूक झाला आयुष म्हात्रे
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आयडल रोहित शर्माची आयुष म्हात्रेने भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान रोहित शर्मासोबत त्याची काय चर्चा झाली, हे जाणून घेऊयात.
Rohit Sharma meet Ayush Mhatre : चेन्नई सुपर किंग्जच्या आयुश म्हात्रे हा टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि हिटमॅन रोहित शर्माचा मोठा फॅन आहे. त्याने अनेकदा आपल्या मुलाखतीत किंवा सामन्यांमध्ये रोहित शर्माचा आपला आयडल असल्याचा उल्लेख केला होता. आता याच आयडल रोहित शर्माची आयुष म्हात्रेने भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान रोहित शर्मासोबत त्याची काय चर्चा झाली, हे जाणून घेऊयात.
खरं तर टीम इंडियाच्या अंडर 19 संघाचा कर्णधार आयुश म्हात्रे हा इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार होता. या दौऱ्याआधी आयुश म्हात्रेला रोहित शर्माकडून काही टिप्स हव्या होत्या. यासाठी त्याने रोहित शर्माला मेसेज केला होता.या मेसेजला रोहित शर्माने उत्तर देत त्याला आपल्या घरचा पत्ता दिला होता.
हा पत्ता मिळताच आयुष म्हात्रे रोहित शर्माच्या घरी पोहोचला.तेथे रोहित शर्मासोबत त्याने जवळ जवळ दोन तासांचा वेळ घालवला. या दरम्यान रोहित शर्माने त्याला क्रिकेट विषयक अनेक सल्ले दिले. हे सल्ले घेऊन नंतर तो इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता.
advertisement
Ayush Mhatre about Rohit Sharma ♥️ pic.twitter.com/Y2AXB6pH7D
— Beast (@Beast__07_) April 2, 2026
दरम्यान या दौऱ्यानंतर आता आयुष म्हात्रे त्याच्या या भेटीचा किस्सा सांगितला आहे. या भेटीबाबत बोलताना आयुष म्हात्रे म्हणतो, माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण माझ्या आयडलने माझ्यासाठी वेळ दिला होता.
advertisement
आयपीएलमध्ये आयुष म्हात्रे हा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो आहे. आयुशने मागच्याच हंगामात चेन्नई सूपर किंग्जकडून डेब्यू केला होता. यावेळी त्याने मुंबई इंडियन्स विरूद्ध डेब्यू सामन्यात 15 बॉलमध्ये 32 धावांची खेळी केली होती. त्याचसोबत त्याने आरसीबी विरूद्ध 48 बॉलमध्ये 94 धावांची खेळी केली होती. दरम्यान मागच्या हंगामातील 7 सामन्यात त्याने 240 धावांची खेळी केली होती.
advertisement
तसेच यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात तो शुन्यावर बाद झाला होता.आता तो पुढच्या सामन्यात कशी कामगिरी करतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 7:33 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : एक मेसेज घरी दोन तासाची भेट, हिटमॅनने बदललं करिअर, रोहितबाबत बोलताना भावूक झाला आयुष म्हात्रे





