Weather Alert : महाराष्ट्रावर संकटाचे ढग, वादळी वारे आणि गारपीट; 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
मागील काही दिवसांपासून राज्यभरातील विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. 4 एप्रिल रोजी राज्यातील 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट भारतीय हवामान विभाग कडून जारी करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. 4 एप्रिल रोजी राज्यातील 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक भागांत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाहुयात विभागानुसार हवामानाचा अंदाज.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मराठवाड्यात संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि जालना या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना आणि वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाशिमसह काही उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता असली तरी वातावरण ढगाळ राहू शकते. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement





