Summer Care : कोरफडीचा रस करेल उन्हाळा सुसह्य, शरीराला मिळेल थंडावा, त्वचा पोट राहिल शांत
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
उन्हाळ्यात, अनेक जण शरीराला थंडावा देणारे आणि त्याचबरोबर वाढणाऱ्या उष्म्यासह आरोग्याचीही काळजी घेणारे घरगुती उपाय शोधतात. कोरफडीचा रस हा नैसर्गिक उपाय आहे. यामुळे, शरीराला थंडावा मिळतो आणि तर त्वचा पोटासाठीही कोरफडीचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो.
मुंबई : उन्हाळा सुरू झाला की अनेकांना त्रास जाणवतो. काहींना जास्त घाम येणं, थकवा जाणवणं, डिहायड्रेशन आणि त्वचेच्या समस्या जाणवतात.
उन्हाळ्यात, अनेक जण शरीराला थंडावा देणारे आणि त्याचबरोबर वाढणाऱ्या उष्म्यासह आरोग्याचीही काळजी घेणारे घरगुती उपाय शोधतात. कोरफडीचा रस हा नैसर्गिक उपाय आहे. यामुळे, शरीराला थंडावा मिळतो आणि तर त्वचा पोटासाठीही कोरफडीचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो.
आयुष मंत्रालयानंही हा रस पिण्याचं आवाहन केलंय. कोरफडीच्या गरात अनेक पोषक घटक असतात आणि हा रस नियमित प्यायल्यानं शरीर आतून निरोगी राहतं.
advertisement
शरीराला थंडावा - कोरफडीचा रस नैसर्गिकरित्या थंड असतो. उन्हाळ्याच्या उष्णतेत हा रस प्यायल्यानं शरीराला आतून थंडावा मिळण्यास मदत होते, ज्यामुळे उष्माघात, चक्कर आणि अस्वस्थतेपासून आराम मिळतो.
त्वचेची चमक - उन्हाळ्यात त्वचा अनेकदा कोरडी किंवा चिकट होते. कोरफडीचा रस त्वचेला आर्द्रता देतो आणि आतून पोषण करतो. हा रस नियमित प्यायल्यानं त्वचा स्वच्छ, मऊ आणि चमकदार होते. तसंच, यामुळे मुरुम आणि डाग कमी होतात.
advertisement
पोट स्वच्छ आणि मजबूत राहतं - उन्हाळ्यात बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लपित्त या समस्या जाणवतात. कोरफडीच्या रसानं पचनसंस्था मजबूत होते आणि पोट स्वच्छ राहतं. कोरफडीच्या रसामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकून राहतं - अति घामामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवू शकते. कोरफडीच्या रसामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी आणि तहान भागवण्यासाठी मदत होते. यातली जीवनसत्त्वं आणि खनिजांमुळे शरीराला ऊर्जा मिळते.
advertisement
रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते - कोरफडीमधे अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक घटक असतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे शरीराला उन्हाळ्यातील आजारांशी लढण्यासाठी तयार होण्यास मदत होते.
advertisement
कोरफडीचा रस कसा बनवायचा?
ताज्या कोरफडीचा गर काढून तो पाण्यात मिसळा. चवीसाठी त्यात लिंबाचा रस, मध किंवा काळं मीठ घालू शकता. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पिणं सर्वात फायदेशीर ठरतं. बाजारात मिळणारे रस देखील वापरता येतात, पण साखरविरहित पर्याय अधिक श्रेयस्कर आहेत.
कोरफडीचा रस फायदेशीर असला तरी, गर्भवती महिला, लहान मुलं किंवा गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी हा रस पिण्यापूर्वी डॉक्टर किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 10:45 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Care : कोरफडीचा रस करेल उन्हाळा सुसह्य, शरीराला मिळेल थंडावा, त्वचा पोट राहिल शांत








