advertisement

Weight Loss : वजन कमी करण्याच्या नादात प्रकृतीची हेळसांड नको, तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय रोजच्या आहारात खूप बदल करु नका

Last Updated:

जेवण टाळणं हा वजन कमी करण्याचा मार्ग नसून, उलट शरीराला रोगांंचं माहेरघर बनवण्याचा एक मार्ग आहे. जेवण टाळणं वजन कमी करण्याच्या प्रक्रियेसाठी कसं हानिकारक ठरू शकतं, हे आपण जाणून घेऊया.

News18
News18
मुंबई : वजन कमी करायचंय असा अनेकांचा संकल्प असतो. पण, अनेकदा हा निर्णय घाईघाईनं घेतला जातो. जेवण टाळणं म्हणजे वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे आणि कमी कॅलरीज घेतल्यानं वजन लवकर कमी होईल, असा समज असेल तर ही माहिती पूर्ण वाचा.
कारण वास्तव याच्या अगदी उलट आहे. जेवण टाळणं हा वजन कमी करण्याचा मार्ग नसून, उलट शरीराला रोगांंचं माहेरघर बनवण्याचा एक मार्ग आहे. जेवण टाळणं वजन कमी करण्याच्या प्रक्रियेसाठी कसं हानिकारक ठरू शकतं, हे आपण जाणून घेऊया.
advertisement
जेवण टाळता, तेव्हा तुमच्या शरीराला आवश्यक कॅलरीज मिळत नाहीत. ऊर्जा वाचवण्यासाठी, शरीर आपली चयापचय क्रिया मंद करतं. परिणामी, पुढच्या वेळी तुम्ही जेवता तेव्हा, तुमचं शरीर त्या कॅलरीजचं ऊर्जेत रूपांतर करून नंतर वापरण्याऐवजी, त्या चरबीच्या रूपात साठवून ठेवतं. यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढतं.
शरीराला व्यवस्थित कार्य करण्यासाठी जीवनसत्त्वं, खनिजं, प्रथिनं आणि कर्बोदकांची आवश्यकता असते. जेवण टाळल्यानं शरीरातील या पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. यामुळे दिवसभर थकवा, अशक्तपणा, चक्कर आणि डोकेदुखी जाणवू शकते. आहारात असे अचानक प्रकार केल्यानं ॲनिमिया आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात.
advertisement
मानसिक आरोग्य आणि एकाग्रतेचा अभाव - मेंदूला कार्य करण्यासाठी ग्लुकोजची आवश्यकता असते, जे आपल्याला अन्नातून मिळतं. भूक लागते, तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते, ज्यामुळे चिडचिड, तणाव आणि चिंता जाणवते. एकाग्रता कमी होऊ शकते.
advertisement
पचनाच्या समस्या - रिकाम्या पोटामुळे आम्लपित्त होऊ शकतं. जेव्हा अन्न दीर्घकाळ पचत नाही, तेव्हा हे आम्ल पोटाच्या आतील आवरणाला इजा पोहोचवू शकतं. ज्यामुळे आम्लपित्त, गॅस, छातीत जळजळ आणि अल्सर यांसारख्या समस्या जाणवायला सुरु होते. याव्यतिरिक्त, अनियमित खाण्यामुळे बद्धकोष्ठता आणि मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोकाही वाढतो.
advertisement
अति खाण्याचा धोका - जेवण टाळण्याचा सर्वात मोठा तोटा हा आहे की, पुढच्या वेळी तुम्ही गरजेपेक्षा जास्त खाऊ शकता. भूक लागल्यामुळे उच्च-कॅलरी आणि गोड पदार्थांची लालसा वाढते, ज्यामुळे तुम्ही जंक फूडकडे अधिक आकर्षित होता. यामुळे वजन कमी होण्याऐवजी ते वाढतं. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Weight Loss : वजन कमी करण्याच्या नादात प्रकृतीची हेळसांड नको, तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय रोजच्या आहारात खूप बदल करु नका
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement