advertisement

इराकमध्ये नाट्यमय घडामोड, अमेरिकन महिला पत्रकाराचे बगदाद शहरातून अपहरण; 5 तासांपासून शोध सुरू, संघर्ष वेगळ्या लेव्हलवर जाणार

Last Updated:

बगदादमध्ये अमेरिकन पत्रकार शेली किटल्सन यांच्या कथित अपहरणामुळे इराकमधील सुरक्षा परिस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना अधिक चिंताजनक मानली जात आहे.

News18
News18
बगदाद: अमेरिकन पत्रकार शेली किटल्सन यांचे इराकमधील बगदाद येथे अपहरण झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘इराण इंटरनॅशनल इंग्लिश’ने ‘अल-हदथ’चा हवाला देत हा अहवाल दिला आहे.
या रिपोर्टनुसार इराकच्या सुरक्षा दलांनी कथित अपहरणकर्त्यांपैकी एकाला अटक केली आहे. मात्र या प्रकरणाबाबत इराक सरकार किंवा अमेरिकन प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
अपहरण नेमके कधी आणि कुठे झाले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. तसेच या घटनेमागील उद्देश काय आहे किंवा कोणत्याही गटाने याची जबाबदारी स्वीकारली आहे का, याबाबतही अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.
advertisement
ही घटना खरी ठरल्यास इराकमधील सुरक्षा परिस्थितीबाबत नव्याने चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः पत्रकार आणि परदेशी नागरिकांसाठी तेथील वातावरण अधिक धोकादायक ठरू शकते कारण सध्या पश्चिम आशियातील तणाव वाढलेला आहे.
बगदादसह इराकमधील अनेक भाग हे आधीपासूनच संवेदनशील मानले जातात. येथे सशस्त्र गटांची उपस्थिती, राजकीय तणाव आणि इराण, अमेरिका व इस्रायल यांच्यातील संघर्षाचा परिणाम यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे.
advertisement
दरम्यान या कथित अपहरणाच्या घटनेमुळे इराकवर पश्चिम आशियातील व्यापक संघर्षाचे पडसाद अधिक तीव्रपणे उमटत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक मिलिशिया, प्रॉक्सी गट आणि प्रादेशिक सत्तासंघर्ष यामुळे इराकची परिस्थिती अधिक अस्थिर होत चालली आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
इराकमध्ये नाट्यमय घडामोड, अमेरिकन महिला पत्रकाराचे बगदाद शहरातून अपहरण; 5 तासांपासून शोध सुरू, संघर्ष वेगळ्या लेव्हलवर जाणार
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement