advertisement

Pune: स्पीड ब्रेकर वाचवायला गेले अन् कंटेनर ट्रकवर आदळला, JCB ने केबिन तोडून ड्रायव्हरला काढलं बाहेर

Last Updated:

 पुणे नाशिक महामार्गावर मंचर नजिक असणाऱ्या एकलहरे परिसरात कंटेनर आणि मालवाहू ट्रकचा रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला

News18
News18
सचिन तोडकर, प्रतिनिधी
मंचर: मागील काही दिवसांपासून राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच एक  पुणे नाशिक महामार्गावर ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. गतीरोधकामुळे कंटेनर हा समोरील ट्रकवर आदळला. या अपघातात चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे.  कंटेनर चालकाचा कंटेनरच्या केबिनमध्ये अडकलेला मृतदेह काढण्यासाठी चक्क जेसीबी यंत्राची मदत घ्यावी लागली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
पुणे नाशिक महामार्गावर मंचर नजिक असणाऱ्या एकलहरे परिसरात कंटेनर आणि मालवाहू ट्रकचा रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला. पुण्याकडून नाशिकच्या दिशेनी ही दोन्ही वाहनं चालली होती. मात्र एकलहरे परिसरात महामार्गावर टाकलेल्या गतिरोधक बसवण्यात आले आहे.
गतिरोधकाचा बचाव करण्यासाठी गती कमी केलेल्या ट्रकवर मागच्या बाजूने भरधाव वेगात असणारा कंटेनर येऊन आदळला. हा कंटेनरचा वेग जास्त असल्यामुळे कंटेनरची केबिन ही जोरात ट्रकच्याा मागील भागात अडकली.  या अपघातात ट्रकचे विशेष नुकसान झाले नसले तरी कंटेनरच्या केबिनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता, तर त्यात कंटेनरच्या चालकाचा मृतदेह अडकला होता.
advertisement
स्थानिकांनी धाव घेऊन कंटेनरमधील चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण, केबिन पूर्ण चक्काचूर झाली होती.  घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांनी JCB यंत्राला प्रचारण करून कंटेनरच्या केबिनमध्ये अडकलेला चालकाचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकर पोलिस पुढील तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune: स्पीड ब्रेकर वाचवायला गेले अन् कंटेनर ट्रकवर आदळला, JCB ने केबिन तोडून ड्रायव्हरला काढलं बाहेर
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement