Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरचा खतरनाक बॉल, मिडल स्टंप 4 वेळा हवेत उडाला, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या या मोसमात लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळणार आहे. आयपीएलच्या या मोसमाआधी अर्जुन मुंबईसोबत होता, पण मुंबईने त्याला लखनऊकडे ट्रेड केलं.
लखनऊ : अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या या मोसमात लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळणार आहे. आयपीएलच्या या मोसमाआधी अर्जुन मुंबईसोबत होता, पण मुंबईने त्याला लखनऊकडे ट्रेड केलं. मागच्या मोसमात अर्जुनला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. लखनऊच्या वॉर्म अप मॅचमध्ये अर्जुनने धमाकेदार बॉलिंग केली. 26 वर्षांच्या अर्जुनने मुंबईकडून 2023 साली आयपीएलमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत त्याने 5 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यात त्याला 9.37 च्या इकोनॉमी रेटने 3 विकेट मिळाल्या आहेत.
लखनऊने शेअर केला अर्जुनचा व्हिडिओ
लखनऊ सुपर जाएंट्सने अर्जुन तेंडुलकरच्या बॉलिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे, यात त्याने वाईड यॉर्कर टाकून दोन विकेट घेतल्या आहेत. एका बॅटरला अर्जुनने बोल्ड केलं तर दुसरा बॅटर बाऊंड्री लाईनवर कॅच आऊट झाला. अर्जुनच्या वाईड यॉर्करवर बॅटरने स्कूप शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल बॅटला लागून थेट मिडल स्टंपवर जाऊन आदळला. बॉल लागल्यानंतर स्टंप चार वेळा हवेत उडाला.
advertisement
Hits the spot, every single time pic.twitter.com/Gli6bXCrQE
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 31, 2026
दुसऱ्या बॅटरला आऊट करण्यासाठी अर्जुनने पुन्हा एकदा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, पण बॉल फुलटॉस पडला, यानंतर बॅटरने लेग साईडच्या दिशेने हवेत शॉट मारला. बॉल बॅटला नीट लागला नसल्यामुळे बाऊंड्री लाईनवर फिल्डरने कॅच पकडला.
advertisement
अर्जुनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार?
आयपीएल 2026 मध्ये बुधवारी लखनऊचा सामना दिल्लीविरुद्ध होणार आहे. लखनऊच्या स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरूवात होईल. लखनऊकडे आवेश खान, मोहसिन खान, मोहम्मद शमी आणि मयंक यादव हे उत्कृष्ट भारतीय बॉलर आहेत, तर एनरिक नॉर्किया हा परदेशी बॉलर आहे, त्यामुळे अर्जुन तेंडुलकरला सुरूवातीच्या सामन्यांमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. अर्जुन खालच्या क्रमांकावर सिक्स आणि फोरही मारून शकतो, त्यामुळे त्याला ऑलराऊंडर म्हणूनही संधी दिली जाऊ शकते.
Location :
Lucknow,Uttar Pradesh
First Published :
Mar 31, 2026 11:14 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरचा खतरनाक बॉल, मिडल स्टंप 4 वेळा हवेत उडाला, Video









