advertisement

IPL Latest Points Table: पंजाबने गुणतक्त्यात केला मोठा उलटफेर, एका झटक्यात 5 संघांना मागे टाकले

Last Updated:

IPL 2026 Points Table: पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जवर शानदार विजय मिळवत IPL 2026 च्या गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले आहे. सलग दुसऱ्या विजयामुळे पंजाबने 4 गुणांसह स्पर्धेत आघाडी घेतली आहे.

News18
News18
चेन्नई: IPL 2026 स्पर्धेत आजचा पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करत गुणतक्त्यात मोठा उटलफेर केला आहे. या विजयामुळे पंजाबने केवळ दोन गुण मिळवले नाहीत तर नेट रनरेटमध्येही सुधारणा करत इतर संघांना मागे टाकले आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने 209 धावा केल्या होत्या. मात्र पंजाबने धमाकेदार फलंदाजी करत मॅच सहज जिंकली.
चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात शानदार विजय मिळवत पंजाबने हंगामातील सलग दुसरा विजय नोंदवला आणि 4 गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली.
गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्स त्यांचे 2 गुण आहेत. त्यांचे नेट रनरेट तब्बल + 4.171 इतके आहे. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू तिसऱ्या, दिल्ली कॅपिटल्स चौथ्या आणि मुंबई इंडियन्स पाचव्या स्थानावर आहेत. या सर्व संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकून 2 गुण मिळवले असले तरी नेट रनरेटच्या आधारे त्यांचे क्रम ठरले आहेत. सनरायझर्स हैदराबादने दोन सामने खेळून एक विजय मिळवत सहाव्या स्थानावर आपली जागा कायम ठेवली आहे.
advertisement
दुसऱ्या बाजूला गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ अद्याप विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. विशेषतः चेन्नई सुपर किंग्जसाठी ही स्पर्धा चिंताजनक ठरत असून त्यांनी सलग दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे ते सध्या गुणतक्त्यात दहाव्या आणि शेवटच्या स्थानावर आहेत. कोलकाताही दोन पराभवांसह खालच्या स्थानी असून त्यांच्या नेट रनरेटवरही मोठा परिणाम झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL Latest Points Table: पंजाबने गुणतक्त्यात केला मोठा उलटफेर, एका झटक्यात 5 संघांना मागे टाकले
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement