advertisement

Mahashivratri 2026 : तब्बल 3201 शिवलिंगांचे भव्य शिवमंदिर, गुप्त 12 ज्योतिर्लिंगांचीही दर्शन, पुण्यात कुठे आहे हे ठिकाण? Video

Last Updated:

या ठिकाणी एकाच ठिकाणी तब्बल 3,201 शिवपिंडींची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराच्या मुख्यद्वारावर भगवान शिवशंकरांची मोठी मूर्ती आहे.

+
News18

News18

पुणे : पिंपरी-चिंचवड हे शहर औद्योगिक नगरी म्हणून ओळखलं जातं. मात्र याठिकाणी अनेक धार्मिक आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरेही आहेत. त्यापैकीच एक म्हणजे चिखली-जाधववाडी परिसरातील 3,201 शिवलिंगांचे शिवमंदिर. या ठिकाणी एकाच ठिकाणी तब्बल 3,201 शिवपिंडींची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराच्या मुख्यद्वारावर भगवान शिवशंकरांची मोठी मूर्ती आहे. तीन मजली या मंदिरावर कळसाऐवजी सुमारे 25 फूट उंचीची भव्य शिवपिंड बसवण्यात आली आहे. तसेच येथे 12 गुप्त ज्योतिर्लिंगांचीही स्थापना करण्यात आली आहे. हे मंदिर साकार होण्यामागे अद्भुत असा इतिहास आहे. या इतिहासाविषयी येथील पुजारी युवराज यांनी माहिती दिली आहे.
मंदिरात 3,201 शिवलिंग, 12 ज्योतिर्लिंग
मंदिराचे पुजारी युवराज यांनी सांगितलं की, या शिवमंदिराच्या उभारणीमागे एक अद्भुत इतिहास दडलेला आहे. चिखली परिसरातील साईराम बाबा यांनी बंगला बांधण्यासाठी सुमारे तीन गुंठे जागा खरेदी केली होती. बांधकामासाठी पाया खोदण्याचे काम सुरू असताना त्या ठिकाणी वारूळ आढळले. ते हटवताना आतमध्ये छोटी महादेवाची पिंड सापडली. ही घटना दैवी संकेत मानत साईबाबा यांनी त्या ठिकाणी मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. युवराज यांच्या मते, त्यानंतरही या परिसरात अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या आणि अद्भुत घटना घडल्या. याच अनुभूतीतून येथे तब्बल 3201 शिवपिंडी आणि बारा गुप्त ज्योतिर्लिंगांची स्थापना करण्यात आली. त्यामुळे आज हे मंदिर भाविकांसाठी श्रद्धा आणि विश्वासाचे केंद्र बनलं आहे.
advertisement
या परिसरात केवळ 3201 शिवपिंडींची स्थापना करण्यात आलेली नाही, तर राम दरबार, हनुमान मंदिर, संतोषी माता मंदिर, दर्गा, गणपती मंदिर, विष्णू मंदिर आणि साई मंदिर अशी विविध धार्मिक स्थळे उभारण्यात आली आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी विविध देवतांचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळते.
advertisement
मंदिर प्रशासनाच्या संकल्पनेनुसार भविष्यात या संपूर्ण परिसराला शिवशक्तीपीठ म्हणून विकसित करण्याचा मानस आहे. याठिकाणी महादेवाच्या पिंडींचे दर्शन घेतल्यानंतर भक्तांना साक्षात शिवदर्शन झाल्याची आध्यात्मिक अनुभूती मिळते, असे भाविक सांगतात. महाशिवरात्री आणि श्रावणातील सोमवारी याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र केवळ उत्सव काळातच नव्हे, तर वर्षभर भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. नवसाला पावणारं मंदिर म्हणूनही या मंदिरांची ख्याती आहे.
view comments
मराठी बातम्या/Temples/
Mahashivratri 2026 : तब्बल 3201 शिवलिंगांचे भव्य शिवमंदिर, गुप्त 12 ज्योतिर्लिंगांचीही दर्शन, पुण्यात कुठे आहे हे ठिकाण? Video
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement