advertisement

पुण्यात BMW चालकाचा धिंगाणा! आधी कारला उडवलं अन् भर रस्त्यात 15 मिनिटं झोप काढली; चांदणी चौक हादरला

Last Updated:

अपघात झाल्यानंतर हा नशेत असलेला चालक गाडी बाजूला घेण्याऐवजी भर ट्रॅफिकमध्ये गाडीतच 10 ते 15 मिनिटे झोपून राहिला

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे  : पुण्यातील रस्त्यांवर मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवून निष्पाप नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या लोकांचा माज काही कमी होताना दिसत नाही. कल्याणी नगरच्या पॉर्शे अपघातानंतरही पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचे प्रकार राजरोसपणे सुरूच आहेत. 18 मार्चला सकाळी चक्क साडेसात वाजता चांदणी चौकासारख्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी एका मद्यधुंद बीएमडब्ल्यू (BMW) चालकाने एका कारला धडक दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.  विशेष म्हणजे अपघात झाल्यानंतर हा नशेत असलेला चालक गाडी बाजूला घेण्याऐवजी भर ट्रॅफिकमध्ये गाडीतच 10 ते 15 मिनिटे झोपून राहिला. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालं नाही आणि मोठा अनर्थ टळला
advertisement
कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्शे अपघातात दोन निष्पाप तरुणांचा बळी गेला होता. त्या घटनेनंतर पुणे पोलीस आणि प्रशासनाने कडक पावले उचलल्याचा दावा केला होता. मात्र, या बीएमडब्ल्यू चालकाच्या वागणुकीवरून असे स्पष्ट होते की अशा विकृत मानसिकतेच्या चालकांना कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही. सकाळी साडेसात वाजता, जेव्हा लोक ऑफिस किंवा कामासाठी घराबाहेर पडतात, तेव्हा हा चालक नशेत गाडी चालवत होता, ही बाब अत्यंत गंभीर आहे.
advertisement

बीएमडब्ल्यू चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी

चांदणी चौक हा पुण्यातील अत्यंत वर्दळीचा भाग आहे. या ठिकाणी अपघात झाल्यानंतर आणि चालकाने गाडीतच झोप काढल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. नागरिकांनी आरडाओरडा करूनही चालक शुद्धीत नव्हता. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही, मात्र अशा बेजबाबदार चालकांमुळे मोठा अनर्थ घडू शकला असता. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता या बीएमडब्ल्यू चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी पुणेकरांकडून होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात BMW चालकाचा धिंगाणा! आधी कारला उडवलं अन् भर रस्त्यात 15 मिनिटं झोप काढली; चांदणी चौक हादरला
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement