advertisement

Success Story : शेतातील कचऱ्याचा असाही उपयोग, इंजिनिअरने उभारला व्यवसाय, कमाईचा आकडा तर पाहाच

Last Updated:
या कंपनीच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जातात. काडी, कचरा, पिकांचा राहिलेला कच्चामाल यावर प्रक्रिया करून खत निर्मिती केली जाते. आज या कंपनीचा टर्नओव्हर तीन कोटींपेक्षाही जास्त आहे.
1/5
सध्याच्या घडीला अनेक जण नवनवीन व्यवसाय करत आहेत. कुणाल जगताप यांनी असाच एक व्यवसाय केला आहे. त्यांनी HAB Biomass या कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जातात. काडी, कचरा, पिकांचा राहिलेला कच्चामाल यावर प्रक्रिया करून खत निर्मिती केली जाते. आज या कंपनीचा टर्नओव्हर तीन कोटींपेक्षाही जास्त आहे.

2/5
मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या कुणाल जगताप यांनी एमबीए ऑपरेशनमधून केलं आहे. कुणालने 2020 मध्ये मानवनिर्मित कोळसा तयार करण्यासाठी HAB Biomass Pvt. Ltd. नावाचा स्टार्टअप सुरू केला. यासाठी त्यांनी एक मोबाइल युनिट (मशीन) तयार केले, जे थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाते. यामध्ये उसाचे पाचट आणि इतर ॲग्रो वेस्ट शेतकऱ्यांकडून खरेदी केले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त साधन मिळते. मशीनमध्ये या कचऱ्याचे रूपांतर बारीक भुशामध्ये केले जाते आणि त्यातून बायोकोल तयार होतो.

3/5
यात कचऱ्याचे रूपांतर तीन मुख्य प्रकारांमध्ये केले जाते. त्यामध्ये Fuel (इंधन) या माध्यमातून स्वच्छ ऊर्जेसाठी बायोमासपासून ब्रिकेट्स आणि पेलेट्स तयार केले जातात. Fertilizer (खत) या माध्यमातून मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी बायोचार आणि वर्मी कंपोस्ट तयार केले जाते. तर Fodder (चारा) या माध्यमातून जनावरांसाठी पोषणयुक्त चाऱ्याचे ब्लॉक्स तयार केले जातात. या तिन्ही उपायांमुळे शेती शाश्वत बनते, पर्यावरणाचे रक्षण होते आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते.

4/5
कुणाल जगताप यांना उच्च उष्मांक जैवकोलमधील नावीन्यपूर्णतेसाठी दिल्ली येथे EYEL राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांची निवड जगप्रसिद्ध स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसच्या सीड स्पार्क प्रोग्राम साऊथ एशिया कोहोर्ट 5 साठी झालेली आहे. कुणाल यांच्या इंडिया-कॅनडा उद्योजकता उपक्रम आणि भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया फ्लॅगशिप प्रोग्राम टुगेदर 2023 मध्ये कुणाल यांच्या उपक्रमाची निवड टॉप 25 स्टार्टअप्समध्ये झाली.

5/5
या व्यतिरिक्त भारत सरकारच्या नीती आयोगानेही त्यांच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. अलीकडेच 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. असे अनेक सन्मान कुणाल जगताप यांच्या कंपनीला मिळाले आहेत.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement