मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या गीतांजली टॉकीज चौकातील सारडा निकेतनमध्ये रितू अजितकुमार सारडा यांचं कुटुंब राहतं. रितू यांना दिल्लीला आपल्या मुलीकडे जायचे होते. यासाठी त्यांनी 10 दिवसांपूर्वीच बँकेच्या लॉकरमधून सोने आणि हिरेजडित दागिने काढून घरातील बेडरुमच्या आलमारीत ठेवले होते. त्यानंतर 10 तारखेला सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या पतीने पैसे मागितले असता, त्यांनी आलमारी उघडली. त्यावेळी आलमारीतील दीड लाख रुपये रोख आणि दागिने आढळून आले नव्हते. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले होते.त्यामुळे त्यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
advertisement
या तक्रारीवरून गुन्हेशाखेचे युनिट तीन आणि सायबर पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला. या घटनेपासून नोकर घरातून फरार असल्याचे समोर आले होते. तसेच त्याचा मोबाइलही बंद होता. त्यामुळे संशयाची सूई नोकरावर जात होती.यावेळी चोरीच्या घटनेच्या तपासा दरम्यान पोलिसांना आरोपी नोकर पश्चिम बंगालला पळून गेल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नागपूरच्या गुन्हेशाखेने त्याचा मागोवा घेत पश्चिम बंगालमधून त्याला अटक केली होती. राजा चौधरी असे या आरोपीचे नाव आहे.
दरम्यान चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.त्याच्याकडून सोन्याचे व हिरेजडित दागिने, तीन मोबाइल, टॅब, चार हजार रुपये रोख असा 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याला पुढील तपासासाठी गणेशपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.