TRENDING:

रामफळ+सिताफळ! आधीपेक्षा गोड, चव तीच! आलंय नवीन वाण

Last Updated:

डॉ. नवनाथ मल्हारी कस्पटे यांनी nmk गोल्ड या सिताफळाच्या वाणाची निर्मिती केली होती. पुन्हा एकदा डॉ. नवनाथ कस्पटे यांनी दोन नवीन वाणाची निर्मिती केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील डॉ. नवनाथ मल्हारी कस्पटे यांनी nmk गोल्ड या सिताफळाच्या वाणाची निर्मिती केली होती. पुन्हा एकदा डॉ. नवनाथ कस्पटे यांनी दोन नवीन वाणाची निर्मिती केली आहे. ते वाण म्हणजे NMK समृद्धी वाण आणि NMK आर्वी होय. या नवीन वाणासंदर्भात अधिक माहिती अक्षय पाटील यांनी लोकल 18 शी बोलताना दिली आहे.
advertisement

बार्शी तालुक्यात डॉ. नवनाथ कस्पटे यांचे सिताफळ संशोधन केंद्र आहे. या सिताफळ संशोधन केंद्रामध्ये नवनवीन वाणाचे संशोधन करून वाणाची निर्मिती केली. डॉ. नवनाथ कस्पटे यांनी त्यांच्या मधुबनमध्ये दोन नवीन वाणाची निर्मिती केली आहे. ते म्हणजे NMK समृद्धी वाण, दुसरं वाण म्हणजे NMK आर्वी असे दोन नवीन वाणाची निर्मिती डॉ. नवनाथ कस्पटे यांच्या मधुबन फार्ममध्ये तयार करण्यात आली आहे. NMK आर्वी या वाणाची उशिरा लागवड करून जुलै किंवा ऑगस्टमध्ये छाटणी करून मार्केटमध्ये विक्रीसाठी उशिरा आणू शकतो. NMK आर्वीला बाजारामध्ये सरासरी दर 300 ते 350 रुपये किलो भाव मिळतो. फळाचे वजन 150 ग्राम ते 200 ग्राम आहे.

advertisement

फूड बिझनेस सुरू करताय? मुंबईत अवघ्या 30 रुपयांत एक डझन प्लेट, कुठं आहे स्वस्तात मस्त मार्केट? Video

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जिद्द असावी तर अशी, न बोलताही फुलतोय व्यवसाय, दादरमधील बॅगवाले काकांची कहाणी
सर्व पहा

दुसरी व्हरायटी म्हणजे NMK समृद्धी. हे वाण सीताफळ आणि रामफळ या दोन्ही वाणांना एकत्रित करून हा वाण तयार करण्यात आला आहे. यामध्ये सिताफळ आणि रामफळ या फळाची चव एकत्रित येते. या वाणामध्ये गराचे प्रमाण जास्त, बियांचे प्रमाण कमी आहे. खाण्यासाठी NMK समृद्धी फळाची चव अतिशय चांगली आहे. तर मार्केटमध्ये हे फळ जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान विक्रीसाठी येते. सिताफळ संपल्यानंतर बाजारात हे फळ विक्रीसाठी येते त्यामुळे या फळाला कोणताही प्रतिस्पर्धी नसतो. शेतकऱ्यांनी याची लागवड करून बाजारात याची मार्केटिंग केली तर या फळाला दर चांगला मिळतो.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
रामफळ+सिताफळ! आधीपेक्षा गोड, चव तीच! आलंय नवीन वाण
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल