TRENDING:

काचेची बॉटल आणि स्वत:चं विमान, दादांना कशाची भीती होती? रोहित पवार यांनी सगळंच सांगितलं

Last Updated:

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या वागण्यात कोणते बदल झाले होते? हे सांगताना त्यांना घातपाताची भीती होती का? अशी शंका रोहित पवार यांनी उपस्थित केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भाने त्यांचे पुतणे, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी नवे धक्कादायक गौप्यस्फोटांच्या मालिकांची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विमान कंपनीच्या कारभारावर शंका उपस्थित करीत वैमानिकाच्या हेतूवरही आक्षेप नोंदवला. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वागण्यात कोणते बदल झाले होते? हे सांगताना त्यांना घातपाताची भीती होती का? अशी शंका रोहित पवार यांनी उपस्थित केली.
रोहित पवार-अजित पवार
रोहित पवार-अजित पवार
advertisement

रोहित पवार काय म्हणाले?

हा अपघात होता की घात होता? आमची शंका आहे की हा घात होता. पार्थ पवार आणि जय पवार यांनाही अपघात नसून हा घातच वाटत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच अपघाताच्या अनुषंगाने जी माहिती आमच्याकडे आली, त्यावरून मी कुणावर शंका घेत आहे असे नाही. बऱ्याच राज्यात संबंधित विमान कंपनी काम करते. तिने आतापर्यंत बऱ्याच वेळा चुकीची माहिती दिली आहे. आमचा सरकार किंवा कुणावर आरोप नाही. पण लगोलग चौकशी केली नाही तर पुरावे दाबून टाकण्यात येतील, अशी भीती रोहित पवार यांनी व्यक्त केली.

advertisement

तसेच गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार हे प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे टाळत होते. ते काचेच्या बाटलीतील पाणी प्यायचे. त्यांच्या मागे त्यांचा एक विश्वासू अधिकारी असायचा, तो त्यांना काचेच्या बाटलीतील पाणी द्यायचा, असे विशेषपणे नमूद करून अजित पवार यांना आपल्यासंदर्भाने घात होऊ शकतो, अशी कल्पना आल्याचे रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.

advertisement

तसेच माझ्या मित्राने हेलिकॉप्टर घेतल्याचे जेव्हा मी अजित पवार यांना सांगितले. त्यावेळी विश्वासू मित्र आहे का? अशी विचारणा त्यांनी केली. त्याचवेळी विश्वासू मित्राचेच हेलिकॉप्टर प्रवासासाठी वापर, असा सल्ला त्यांनी मला दिला होता, असेही रोहित पवार यांनी आवर्जून सांगितले. रोहित पवार यांनी सांगितलेल्या प्रसंगानंतर दादांना घातपाताची भीती होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

advertisement

संथ गतीने तपास कराल तर...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्याचा गणेशची कमाल, काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास केला 16 दिवसांत पूर्ण
सर्व पहा

राजकीय दृष्टीकोनातून नाही पण व्यावहारिक दृष्टीने काही गोष्टी दाबल्या जात आहे, असे आम्हाला वाटते. संथ गतीने जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला तपासात रूची नाही असे म्हणावे लागले. संबंधित कंपनीच्या सेवा बंद करून तत्काळ त्यांची परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मोठी मागणी रोहित पवार यांनी केली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काचेची बॉटल आणि स्वत:चं विमान, दादांना कशाची भीती होती? रोहित पवार यांनी सगळंच सांगितलं
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल