TRENDING:

Saptashrungi Devi : पांढऱ्या साडीत आदिशक्ती आई सप्तशृंगीचे पहिले रूप, देवीला पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी...

Last Updated:

आज पासून शारदीय नवरात्र उत्वसाची सांगता झाली आहे. आदिशक्ती आदि माया आई सप्तशृंगी देवीचे पाहिले रूप आपण लोकल १८ च्या माध्यमातून बघू शकत आहोत. अर्ध शिक्तपीठ असलेल्या आई सप्तशृंगी देवीचा पहिला श्रृंगार पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आजपासून शारदीय नवरात्र उत्वसाची सांगता झाली आहे. याचा शुभ पर्वावर आदिशक्ती आदि माया आई सप्तशृंगी देवी चे पाहिले रूप आपण लोकल १८ च्या माध्यमातून बघू शकत आहोत.
advertisement

अर्ध शिक्तपीठ असलेल्या  आई सप्तशृंगी देवीचा पहिला श्रृंगार पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहे. आज शारदीय नवरात्रीची पहिली माळ असून नऊ रंगान मधील पहिला रंग पांढरा असल्याने आईला देखिक पांढरे वस्त्र परिधान करण्यात आले आहे. गळ्यात रुद्राक्ष माळ कापडावर चंदनाचा गंध डोक्यावर मोगऱ्याचा गजरा असे आजचे देवीचे रूप आहे. 

advertisement

सकाळी ९ वाजता सप्तश्रृंगी गडावर घटस्थापना करून देवीची विधीवत पूजा करण्यात आली. त्या नंतर देवीची आरती करून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. शिवाय, शारदीय नवरात्रीनिमित्त आजपासून सप्तश्रृंगी देवीचे मंदिर २४ तास दर्शनासाठी उघडे राहणार आहे. आजच्या पहिल्या दिवसाचे आईचे पांढऱ्या साडीतील रूप अतिशय सुंदर दिसत आहे. देवीचे हे मनमोहक रूप सर्वांचेच लक्ष वेधत आहे. 

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Saptashrungi Devi : पांढऱ्या साडीत आदिशक्ती आई सप्तशृंगीचे पहिले रूप, देवीला पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल