आदिती तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. निकषात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. मात्र त्याचं पालन कठोरपणे केलं जाणार आहे. अडीच लाखहून अधिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांबाबत तक्रारी आल्या आहेत. काहींनी स्वत: अर्ज बाद करा अशी विनंती केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता अर्जांची फेरतपासणी केली जाणार आहे.
advertisement
निकष आहेत त्या निश्चित केल्यात त्यालाच कायम ठेवून आम्ही फेरतपासणीची कार्यपद्धत निवडली आहे. इनकम टॅक्स आहे, अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार, इनकम टॅक्स डेटा रिक्नसाइल करणं हा विषय घेतला आहे. स्वत: हून तक्रारी आल्यात, त्यांचे अर्ज बाद झाले आहेत, आयकरच्या डेटाची मदत घेऊन रिकन्झाइल करणार. शिवाय यासाठी परिवहन विभागाची देखील मदत घेणार आहेत. ज्यांच्या नावावर कार-दुचाकी रजिस्टर आहे अशा महिलांना याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे या महिलांचे अर्ज बाद होणार आहेत.
याआधी पुण्यात 10 हजार फॉर्म रद्द करण्यात आले. राज्याच्या वेगवेगळ्या भागात कुठे तीन तर कुठे सहा हजार फॉर्म रद्द झाल्याची माहिती समोर आली होती. आता निकष कठोर करण्यात आल्यानंतर आणखी काही अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 6 हप्ते जमा झाले आहेत. सातवा हप्ता संक्रांतीआधी येईल अशी चर्चा आहे.
या महिला ठरणार अपात्र
ज्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
या चारचाकी वाहनांमधून ट्रॅक्टर वगळण्यात आलं आहे.
ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ येथून पुढे मिळणार नाहीये.
ज्या महिला किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.
कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये काम करत असतील.
तसंच मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्य करत असतील.
सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेत असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार आहे.
ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.