सरकारने लाडकी बहीण योजना पात्रतेसाठीच्या निकषात कुठलेही बदल करण्यात आले नाहीत, मात्र हे नियम कठोर केले जाणार आहे. ज्या ज्या भागातून तक्रारी आल्या त्या लाभार्थ्यांच्या अर्जांची आणि कागदपत्रांची पुन्हा छाननी होणार. दिलेल्या माहितीमध्ये आणि प्रत्यक्षात तफावत असेल तर तातडीनं त्या लाभार्थ्यांचे अर्ज बाद केले जाणार असल्याचं अदिती तटकरे यांनी सांगितलं.
advertisement
Ladki Bahin Yojana: अर्जाची छाननी कशी होणार, कोण ठरणार अपात्र? अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
काही महिलांना या योजनेचा लाभ येथून पुढे मिळणार नाही. योग्य माहिती नसेल तर तुम्हाला योजनेंपासून वंचित राहावे लागू शकते. खाली दिलेली माहिती वाचून जाणून घ्या कोणत्या महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल.ज्या महिलांचे किंवा त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक एकत्रित उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
ज्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे, त्या या योजनेसाठी पात्र नाहीत. तथापि, ट्रॅक्टर या नियमातून वगळण्यात आले आहे.जर लाभार्थी कुटुंबामध्ये दुचाकीच्या वर कोणतेही वाहन (जसे की कार) असेल, तर त्या महिलेला योजनेचा लाभ मिळणार नाही.आधार कार्ड आणि बँक खात्याच्या नावामध्ये काहीही तफावत आढळल्यास त्या महिला योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
Ladki Bahin Yojana: 2100 मिळणार की गुलिगत धोका? पुढच्या हप्ताला समजणार, लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट्स
ज्या महिलांचे कुटुंबातील सदस्य आयकर भरणारे आहेत, त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी विभागामध्ये नियमित, कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असतील, त्या महिलांना ही योजना लागू होणार नाही. जर कोणत्याही लाभार्थी महिलांचे उत्पन्न पूर्वीच्या तुलनेत वाढले असेल आणि त्या सरकारी नियमांनुसार पात्रतेच्या श्रेणीबाहेर जात असतील, तर त्यांना योजनेतून अपात्र घोषित केले जाईल.