TRENDING:

Central Railway : प्रवाशांची होणार धावपळ, गोल्डन टेंपल मेल आता नव्या स्थानकावरून सुटणार; वाचा नवीन वेळापत्रक

Last Updated:

Golden Temple Mail Update : प्रवाशांनो जर तुम्हीही या ट्रेनने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा कारण एक लोकप्रिय असलेली एक ट्रेन आता नव्या स्थानकावरुन सुटणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे. एका लोकप्रिय एक्सप्रेस गाडीच्या टर्मिनलमध्ये करण्यात आलेला तात्पुरता बदल आता पुढील सहा महिन्यांसाठी कायम ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ही गाडी पूर्वीप्रमाणे मुंबई सेंट्रल स्थानकावरून न सुटता वांद्रे टर्मिनस येथूनच सुटणार आणि तेथेच तिचा प्रवास संपणार आहे.
Golden Temple Mail Bandra Terminus update
Golden Temple Mail Bandra Terminus update
advertisement

गोल्डन टेंपल मेल आता दुसऱ्या स्थानकावरून धावणार

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी याबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. या माहितीनुसार गाडी क्रमांक 12903 मुंबई सेंट्रल-अमृतसर 'गोल्डन टेंपल मेल’' ही गाडी 17 ऑगस्टपर्यंत मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे टर्मिनस येथून सुटेल. तसेच गाडी क्रमांक 12904 अमृतसर-मुंबई सेंट्रल 'गोल्डन टेंपल मेल' ही गाडी 15 ऑगस्टपर्यंत मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे टर्मिनस येथेच येऊन समाप्त होणार आहे.

advertisement

या बदलामुळे मुंबई सेंट्रल स्थानकावर चढणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या नियोजनात बदल करावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळेत ही माहिती लक्षात घेऊन आपले तिकीट, प्रवासाचे साधन आणि वेळापत्रक यानुसार नियोजन करावे असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.

अधिकृत माहिती संकेतस्थळावर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी,माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, कमाई तर पाहा
सर्व पहा

दरम्यान गाडीचे बदललेले वेळापत्रक, थांबे, डब्यांची रचना तसेच इतर सविस्तर माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Central Railway : प्रवाशांची होणार धावपळ, गोल्डन टेंपल मेल आता नव्या स्थानकावरून सुटणार; वाचा नवीन वेळापत्रक
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल