तुमची गाडीच ठरणार म्युझिक प्लेयर
या उपक्रमांतर्गत कोस्टल रोडवर विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून म्युझिकल पट्टे बसवण्यात आले आहेत. हे पट्टे नरिमन पॉइंटकडून वरळीकडे जाणाऱ्या उत्तर मार्गिकेवर असून बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर लगेचच सुरू होतात. सुमारे 500 मीटर लांबीच्या या मार्गावर ही सुविधा उपलब्ध आहे.
'जय हो'चे स्वर उमटतात तरी कसे?
एखादे वाहन ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने या पट्ट्यांवरून गेल्यास वाहनाच्या चाकांमधील घर्षणामुळे संगीत निर्माण होते. विशेष म्हणजे या वेळी स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील लोकप्रिय 'जय हो' गाण्याची धून ऐकू येते.
advertisement
रस्त्याच्या ठरावीक अंतरावर विशेष खाचे तयार करण्यात आले आहे. वाहन ठरावीक वेगाने या खाच्यावरून गेल्यास चाकांच्या हालचालीतून आवाज तयार होतो आणि त्यातून संगीत ऐकू येते. वाहनचालकांनी योग्य वेग राखावा यासाठी 500 मीटर, 100 मीटर आणि 60 मीटर अंतरावर विशेष सूचनाफलकही लावण्यात आले आहेत.
हा उपक्रम केवळ मनोरंजनासाठीच नव्हे तर चालकांना वेगमर्यादेत वाहन चालवण्यासाठी प्रोत्साहित करणारा ठरणार आहे.
