महत्त्वाच्या ४ समित्यांचे वाटप पूर्ण
महापालिकेच्या कारभारात कणा मानल्या जाणाऱ्या चार प्रमुख समित्यांच्या वाटपावर दोन्ही पक्षांचे एकमत झाले असून त्याचे स्वरूप समोर आले आहे. यात महापालिकेचे सर्व आर्थिक प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार असलेली आणि आशियातील सर्वात श्रीमंत पालिकेची तिजोरी मानली जाणारी 'स्थायी समिती' भाजपने स्वतःकडे ठेवली आहे. यासह भावी पिढीचे शिक्षण धोरण ठरवणारी 'शिक्षण समिती' देखील भाजपकडेच राहणार आहे.
advertisement
बारामती जिल्हा परिषद निवडणूक निकाल Live: सर्वात कमी मतदान, काही क्षणात निकाल, धाकधूक वाढली
दुसरीकडे, मुंबईतील जमिनीचे व्यवहार आणि भूखंडांचे आरक्षण ठरवणारी महत्त्वाची 'सुधार समिती' शिवसेनेला देण्यात आली आहे. तसेच मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या 'बेस्ट' (BEST) परिवहन उपक्रमाची समितीही शिवसेनेकडे सोपवण्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे.
२० फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार
मिळालेल्या माहितीनुसार, या चार महत्त्वाच्या समित्यांचे अधिकृत वाटप २० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर पुढील २ ते ३ आठवड्यांत प्रभाग समित्यांसह इतर वैधानिक समित्यांच्या वाटपाची प्रक्रिया पार पडेल. या सत्तावाटपामुळे मुंबई महापालिकेच्या रखडलेल्या धोरणात्मक निर्णयांना आता वेग येण्याची शक्यता आहे.
