TRENDING:

Weather Alert : पुढील 24 तास महत्त्वाचे, कल्याण-डोंबिवलीवर दुहेरी संकट, IMD नं दिला अलर्ट

Last Updated:
9 फेब्रुवारी रोजी राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे आणि उबदार राहणार असून येत्या 48 तासांत किमान तापमानात 2-3 अंशांची घट होऊन थंडीचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
1/5
पुढील 24 तास महत्त्वाचे, कल्याण-डोंबिवलीवर दुहेरी संकट, IMD नं दिला अलर्ट
महाराष्ट्रात सध्या थंडीची तीव्रता कमी होत चालली असून फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून हवामानात चढउतार जाणवत आहे. राज्यातील नागरिकांना सकाळी सौम्य गारवा आणि दुपारी वाढती उष्णता असा दुहेरी अनुभव येत आहे. 9 फेब्रुवारी रोजी राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे आणि उबदार राहणार असून येत्या 48 तासांत किमान तापमानात 2-3 अंशांची घट होऊन थंडीचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यावरून ठाणे जिल्ह्यासह इतर भागातील हवामानाची स्थिती कशी असेल बघुयात.
advertisement
2/5
ठाणे जिल्ह्यातील हवामान मुख्यत्वे स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे .गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमान स्थिर होते, सोमवारी मात्र किमान तापमानात घट होऊन 30-33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअ असेल,सकाळी काहीसा गारवा जाणवेल ,परंतु प्रत्यक्ष हवामानात बदल होऊन दुपारी कडक उन्ह अनुभवायला येईल.
advertisement
3/5
कल्याण-डोंबिवलीत हवामान मुख्यत्वे स्वच्छ आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि रात्री हलका गारवा असेल,तर दुपारी कडक ऊन असल्याने नागरिकांनी, विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यावी.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण प्रामुख्याने स्वच्छ आणि सूर्यप्रकाशित राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 18-20 अंश सेल्सिअस तर कमाल तापमानात वाढ झाली असून 36-38 अंश सेल्सिअस राहील. दिवसा हवामान उबदार असून संध्याकाळी गारवा राहील. आजचे हवामान बाहेर फिरण्यासाठी किंवा ग्रामीण भागातील कामांसाठी सुखद असेल.
advertisement
5/5
बदलापूरमधील हवामान गेल्या दोन दिवसांपासून स्थिर आहे, सोमवारी वातावरण सुखद आणि कोरडे असून कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस किमान तापमान 12 अंश सेल्सिअस असेल. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील हवामान स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. दिवसा ऊन राहील, कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस असेल. सकाळच्या वेळी हलकी थंडी आणि दुपारनंतर कडक ऊन राहण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert : पुढील 24 तास महत्त्वाचे, कल्याण-डोंबिवलीवर दुहेरी संकट, IMD नं दिला अलर्ट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल