'आता तुला मी सोलते...', BBM6 च्या घरात येताच राखी सावंतने घेतली तन्वी कोल्तेची शाळा, अभिनेत्रीचं तोंडच पडलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rakhi Sawant Wild Card Entry In Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात आता खऱ्या अर्थाने ठिणगी पडणार आहे, कारण पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून खुद्द राखी सावंत घरात एन्ट्री घेत आहे.
advertisement
1/6

मुंबई : जिच्याशिवाय 'बिग बॉस'चा कोणताही सिझन पूर्ण होऊ शकत नाही, ती 'ड्रामा क्वीन' आता पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे. 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात आता खऱ्या अर्थाने ठिणगी पडणार आहे, कारण पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून खुद्द राखी सावंत घरात एन्ट्री घेत आहे.
advertisement
2/6
कलर्स मराठीने नुकताच याचा अधिकृत धमाका केला असून, राखीच्या येण्याने घरातील समीकरणं आता पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळणार, हे स्पष्ट झालंय.
advertisement
3/6
आपल्या एन्ट्रीबद्दल बोलताना राखीने नेहमीच्या बेधडक अंदाजात सांगितलं की, "राखी जाणार आणि गेम पूर्ण पालटणार! माझ्याशिवाय बिग बॉस अधुरं आहे, हे जगाला माहितीये. मी घरात गेले की सगळ्यांचा आवाज आपोआप गायब होतो. तिथे फक्त राखीची मर्जी चालणार. माझे अतरंगी कपडे, माझा गेम आणि माझी धम्माल पाहण्यासाठी तयार राहा."
advertisement
4/6
राखीने घरात एन्ट्री करताना संपूर्ण सोनेरी रंगाचा गाऊन आणि डोक्यावर नागिन मुकुट घातला होता. इतकंच नाही, तर तिच्या हातात एक पुंगीही होती.
advertisement
5/6
घरात येताच तिने तन्वी कोल्तेची शाळा घेतली. राखीने तन्वीचा उल्लेख तन्वी कोळसे असा केला. त्यावर तन्वीने तिचं आडनाव कोल्ते असल्याचं सांगितलं. यावर राखीने तिला उत्तर दिलं, "आता मी तुला चांगलंच सोलते." राखीचं उत्तर ऐकून तिथे एकच हशा पिकला.
advertisement
6/6
आतापर्यंत घरातील स्पर्धकांमध्ये जी काही रस्सीखेच सुरू होती, तिथे आता राखी सावंत स्वतःचे नियम लावणार आहे. राखी कोणाशी मैत्री करणार, कोणाला रडवणार आणि कोणाच्या नाकी नऊ आणणार, हे पाहणं रंजक ठरेल. राखीच्या येण्याने घराचं तापमान वाढणार असून प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आता तुला मी सोलते...', BBM6 च्या घरात येताच राखी सावंतने घेतली तन्वी कोल्तेची शाळा, अभिनेत्रीचं तोंडच पडलं