यलो लाईन ठरणार मुंबईकरांसाठी मोठा दिलासा
पूर्व मुंबईतील नागरिकांना सायन-पनवेल महामार्गावरील सततच्या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ऑफिसच्या वेळेत तर परिस्थिती अधिकच कठिण होते आणि प्रवाशांना तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावे लागते. मात्र आता मुंबई मेट्रो लाईन 2बी (यलो लाईन) पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणारा महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे.
advertisement
मेट्रो लाईवर लवकरच नवीन स्थानक खुले
अंधेरी पश्चिमेतील डीएन नगर ते मानखुर्द पूर्वेतील मंडाले दरम्यान धावणारी ही 23.64 किलोमीटर लांबीची मेट्रो लाईन शहरातील पूर्व-पश्चिम प्रवास अधिक सोपा करेल. या मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक एप्रिल 2026 मध्ये प्रवाशांसाठी खुले होणार आहे. विशेष म्हणजे चेंबूर मेट्रो स्टेशनचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला असून त्यामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अन्य स्थानके कोणती असतील?
या मार्गावर ईएसआयसी नगर, प्रेम नगर, इंदिरा नगर, नानावटी हॉस्पिटल, खेरानगर, सारस्वत नगर, नॅशनल कॉलेज, वांद्रे, आयकर विभाग कार्यालय, आयएलएफएस, एमटीएनएल, बर्वे मार्ग, कुर्ला पूर्व, पूर्व द्रुतगती मार्ग, चेंबूर, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल, मानखुर्द आणि मंडाले अशी स्थानके असतील.
संपूर्ण मार्गिका कधी होणार सुरु?
सध्या पहिला टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर असून सुरक्षा प्रमाणपत्राची प्रक्रिया सुरू आहे. संपूर्ण मार्ग 2026 ते 2027 दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. ही लाईन मेट्रो 1, 2 आणि 3 शी जोडली जाणार असून लोकल ट्रेन आणि मोनोरेलशीही कनेक्टिव्हिटी उपलब्ध होई
