TRENDING:

Mumbai: मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर होणार जप्तीची कारवाई, BMC चा कठोर निर्णय

Last Updated:

मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम २०३ अन्वये अशा थकबाकीदारांना जप्तीची नोटीस बजावण्यात येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मालमत्ताकर भरणा करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या तसेच पुरेशी आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम २०३ अन्वये अशा थकबाकीदारांना जप्तीची नोटीस बजावण्यात येत आहे. निर्धारित कालावधीत थकबाकी रक्कम भरली नाही तर संबंधित मालमत्तेवर जप्तीची तसेच पुढील टप्प्यात लिलावाची कारवाई करण्यात येणार आहे.
News18
News18
advertisement

महापालिकेच्या या कारवाईचा उद्देश प्रामाणिक करदात्यांवर अन्याय होऊ न देणे, कर वसुलीला गती देणे आणि महानगरातील नागरी सुविधा, पायाभूत सेवा व विकासकामांसाठी आवश्यक महसूल सुनिश्चित करणे हा आहे. त्यामुळे सर्व मालमत्ताधारकांनी वेळेत मालमत्ता कराचा भरणा करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

भारतातातला सर्वांत पहिला मेलडी रोड, आता कोस्टल रोडला मिळणार नवी ओळख, 'जय हो' ची वाजणार धून

advertisement

महानगरपालिका प्रशासनाने सातत्याने आवाहन करून आणि पाठपुरावा केल्यानंतरही मालमत्ता कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ता धारकांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जप्ती आणि अटकावणीची कठोर कारवाई करण्यात येत आहे. या मालमत्तांमध्ये भूखंड आणि निवासी - व्यावसायिक इमारती, व्यावसायिक गाळे, औद्योगिक गाळे आदींचा समावेश आहे.

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शहर डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार आणि सहआयुक्त कर निर्धारण व संकलन विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांकडून करसंकलन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व संबंधितांनी दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे. तथापि, कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

advertisement

महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५ - २६ मध्ये दिनांक १ एप्रिल २०२५ पासून ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ५,४२६ कोटी ८१ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. तसेच, पुढील दोन महिन्यांसाठी मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीने व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या दृष्टीने विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू आहे.

advertisement

कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कलम २०३ अन्वये जप्तीची नोटीस बजावण्यात येत आहेत. विहित मुदतीत कर भरणा न केल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित मालमत्तेवर कलम २०३, २०४, २०५, २०६ अन्वये प्रथमतः मालमत्तेतील चीज वस्तू जप्त करून लिलाव केला जाणार आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक २५९२ / २०१३ च्या अंतरिम आदेशान्वये जर संबंधित मालमत्तेकडून येणे अपेक्षित कर वसूल न झाल्यास मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असे नोटीसीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर मालमत्ताकर थकविणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात येत आहे.

advertisement

दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी कर भरण्यासाठी पाठपुरावा केलेल्या टॉप टेन मालमत्ता धारकांची यादी-

१) मेसर्स कमला मिल्स (जी दक्षिण विभाग) - १२ कोटी ०१ लाख ६५ हजार ८५० रुपये

२) मेसर्स सुमेर कॉर्पोरेशन चांदिवली फार्म्स (एल विभाग) - ११ कोटी ९८ लाख ८३ हजार १४४ रुपये

३) मेसर्स ट्रान्सकॉन शेठ क्रिएटर्स (पी उत्तर विभाग) - ११ कोटी ९८ लाख ४७ हजार १३१ रुपये

४) मेसर्स फोरमोस्ट रिऍल्टर्स प्रायव्हेट (एच पूर्व विभाग) - ११ कोटी ९१ लाख ०७ हजार ५६२ रुपये

५) मेसर्स श्री साई ग्रुप (के पश्चिम विभाग) - ११ कोटी ३१ लाख ७५ हजार ७१७ रुपये

६) मेसर्स अॅकॉर्ड बिल्डर्स (एल विभाग) - ११ कोटी २० लाख ४५ हजार ४२९ रुपये

७) मेसर्स सुमेर कॉर्पोरेशन चांदिवली फार्म्स (एल विभाग) - १० कोटी ६३ लाख ०५ हजार २८६ रुपये

८) मेसर्स आमीर पार्क्स ऍण्ड ऍम्युझमेंट प्रायव्हेट लिमिटेड (पी दक्षिण विभाग) - ९ कोटी ५६ लाख १८ हजार ९७९ रुपये

९) मेसर्स इम्तियाज अब्दुल गफार (के पश्चिम विभाग) - २ कोटी ५४ लाख ५४ हजार ६८५ रुपये

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी,माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, कमाई तर पाहा
सर्व पहा

१०) अमीनउल्लाह जहिदुल्लाह (एच पश्चिम विभाग) - २ कोटी ५१ लाख ३० हजार ४३७ रुपये

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर होणार जप्तीची कारवाई, BMC चा कठोर निर्णय
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल