राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल धक्कादायक खुलासे केले आहे. आता रोहित पवार हे दिल्लीला जाणार आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी १२ वाजता ते दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहे.
advertisement
"बारामती येथील विमान अपघातात अजितदादांच्या झालेल्या दुर्दैवी निधनाबाबत माझ्या मनात आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात अनेक शंका आहेत. या संदर्भात, उद्या बुधवार, ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता दिल्लीतील प्रेस क्लब येथे मी एक पत्रकार परिषद घेणार असून, त्यामध्ये काही महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे सविस्तरपणे मांडणार आहे." असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे रोहित पवार अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये काय खुलासे करतात हे पाहण्याचं ठरणार आहे.
विदर्भातला नेता कोण?
दरम्यान, रोहित पवार यांनी अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल माहिती देत असताना आदल्यादिवशी मुंबईत काय घडलं होतं, याची माहिती दिली. "कदाचित घातपात असण्याची शक्यता आहे. २७ जानेवारी रोजी वेळापत्रकानुसाार दादा संध्याकाळी मुंबईहून गाडीने पुण्यात येणार होते. ताफा देखील लागला होता. पण दादा निघाले नाहीत. पण गाडीने जाऊ शकले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचं विमान २७ तारखेला बूक केलं होतं. पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या फाईलीवर सही करायची होती. त्या फाईलीवर सही करायची होती. दादा एका मोठ्या नेत्याला भेटणार होते, त्या नेत्याला यायला उशीर झाला का. दादांचा मोबाईल चेक करा, लँडलाईन फोन चेक करा. त्या फाईलीवर सही करायची होती, दादा कोणतीही फाईल रिकामी ठेवत नाही. ती फाईल मंत्रालयात होती. दादांच्या केबिनमध्ये दादांनी ती फाईल बोलावली, त्यामुळे येईपर्यंत वेळ गेला, ती फाईल आली. एक मोठा नेता बोलत असेल तर दादांनी फाईलीवर सही केली. त्यामुळे दादांना यायला उशीर झाला आणि ते विमानाने आले होते' असा धक्कादायक दावाही रोहित पवारांनी केलाा.
