TRENDING:

दादांच्या खुर्चीचा नमन, आईने सूत्रे स्वीकारली, पार्थ पवार हुंदक्यांनी दाटले, भावनिक करणारा Video

Last Updated:

Sunetra Pawar: राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. या बैठकीला पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार उपस्थित राहणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अजित पवार यांच्यावरील दशक्रिया विधिनंतर सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. राज्याच्या पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्लीकारल्याने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला. मात्र या प्रसंगाला अजितदादांच्या निधनाची भावनिक किनार होती. मंत्रालयातील केबिनमध्ये अजित पवार ज्या खुर्चीवर बसायचे, त्या खुर्चीला नमन करून सुनेत्रा पवार यांनी कार्यभार स्वीकारला. हे चित्र पाहताना पार्थ पवार कमालीचे भावुक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
पार्थ पवार भावनिक
पार्थ पवार भावनिक
advertisement

अजित पवार यांचा दशक्रिया विधी होईपर्यंत बारामतीत थांबलेल्या सुनेत्रा पवार सोमवारी मुंबईला आल्या. उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारण्याआधी त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतींना चैत्यभूमीवर जाऊन वंदन केले तसेच सिद्धीविनायकाच्या चरणी लीन झाल्या. त्यानंतर सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्यांनी मंत्रालयात पाऊल ठेवले. अजित पवार यांच्या स्मृतीला वंदन करून त्यांनी राज्यातील लोकांच्या सेवेसाठी प्रण केला. यावेळी सगळेच भावुक झाले होते.

advertisement

...अन् पार्थ पवार यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले

अजित पवार यांनी महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. त्याच खुर्चीवर आई सुनेत्रा पवार यांना बसताना पाहून पार्थ पवार यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. उपस्थित असणाऱ्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पार्थ पवार यांना आधार दिला. मात्र ते बऱ्याच वेळ हुंदक्यांनी दाटले. गत काही वर्षांतील आठवणींचा पट पार्थ पवार यांच्या डोळ्यासमोर गेला असावा, त्यामुळेच ते कमालीचे भावुक झाले, असे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

advertisement

कॅबिनेटलाही हजेरी लावणार

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. या बैठकीला पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार उपस्थित राहणार आहे. त्याआधी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह त्यांनी प्रि-कॅबिनेटला हजेरी लावली.

advertisement

सुत्रे स्वीकारण्याआधी बाबासाहेबांना वंदन, नंतर बाप्पाला वंदन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
यश अन् श्रुतीनं डोकं लावलं, चायनिज भेळ खायला मुंबईकरांच्या रांगा, का आहे खास? Vi
सर्व पहा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, युवा नेते पार्थ अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
दादांच्या खुर्चीचा नमन, आईने सूत्रे स्वीकारली, पार्थ पवार हुंदक्यांनी दाटले, भावनिक करणारा Video
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल