खरंतर, एका युजरने कुनिकाच्या मुलाचा आणि गायक कुमार सानू यांचा AI जनरेटेड फोटो तयार करून तो X वर पोस्ट करत त्यांना ट्रोलिंग करायला सुरूवात केली. त्या फोटोचा वापर करून ट्रोलर्सने त्यांना शारीरिक व्यंगाने ट्रोल करायला सुरुवात केली. तो फोटो पोस्ट करताना ट्रोलरने आक्षेपार्ह्य कॅप्शन दिले होते. तो वाद कमी की काय म्हणून, नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा कुनिका आणि तानिया मित्तल यांच्यातील जुना वाद उकरून काढला. त्यांच्यातल्या जुन्या संभाषणाचा उल्लेख केला. कॅप्शनमध्ये ट्रोलरने कुनिकावर कुमार सानूसोबतच्या रिलेशनवर आणि त्यांच्यातील लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ट्रोलरने कुनिकावर, "कुनिका, तू तेव्हा खरं बोलायला हवं होतंस ना बाबू..." अशी उपहासात्मक टीका केली आहे.
advertisement
आंचल नावाच्या एका युजरने कुनिकाच्या मुलाचा आणि गायक कुमार सानू यांचा AI जनरेटेड फोटो शेअर केलेला आहे. त्यामध्ये तिने त्या दोघांमधील साम्यता चाहत्यांना दाखवली आहे. वादामध्ये ट्रोलरने कुनिका सदानंदच्या फॅमिलीला आणि कुमार सानूला ओढल्याबद्दल आता कुनिकाने कडक भूमिका घेतली आहे. तिने स्पष्ट केले की ती हा अपमान सहन करणार नाही. कुनिका म्हणाली, "हे खूपच पुढे जात आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यांना 'पर्सनॅलिटी राईट्स' अडकवले जात आहे. मी या दुष्ट व्यक्तीला सोडणार नाही. चतुर्वेदी मॅडम, फक्त वाट पहा." त्यानंतर त्या एक्स युजरकडून हे ट्विट डिलीट करण्यात आले. कुनिकाने या ट्वीटर वॉरमागे काही गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
तान्या मित्तलला आणि तिच्या चाहत्यांना थेट टॅग करत तिने विचारले की, "इतरांच्या कुटुंबांवर चिखलफेक करणे हे तान्या मित्तलच्या लोकप्रियतेचे मेजरमेंट आहे का? या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला सर्वांना खरोखरच आनंद मिळतो का?" दरम्यान, कुनिका सदानंद ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींपैकी एक आहे. तिने 1988 मध्ये रिलीज झालेल्या "कब्रिस्तान" या हॉरर चित्रपटामधून तिच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर कुनिकाने "बेटा", "गुमराह" आणि "खिलाडी" सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये खलनायकी आणि विनोदी भूमिका साकारून स्वत:ची ओळख निर्माण केली. ती अलीकडेच सलमान खानच्या "बिग बॉस १९" शोमध्येही दिसली, जिथे तिच्या स्पष्टवक्त्या शैलीला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.
सोशल मीडियावर कुनिका सदानंद यांना कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून नेटकरी ट्रोल करत आहेत. तर काही त्यांना सपोर्ट करत आहेत. सेलिब्रिटींच्या वादामध्ये त्यांच्या मुलांना खेचणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर कुनिकाला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. कुनिकाने एक्सवर कायदेशीर कारवाईचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे येत्या काळात हा वाद आणखी वाढू शकतो हे स्पष्ट झाले आहे.
