TRENDING:

Prajakta Mali : 'हे असतं कपल गोल', प्राजक्ता माळीची पोस्ट; शेअर केला खास फोटो

Last Updated:
Prajakta Mali in Couple Goal : अभिनेत्री प्राजक्ता माळीनं अनेकदा तिचं प्रेम आणि ब्रेकअपवर भाष्य केलं. कपल गोल काय असतं यावर प्राजक्तानं खास फोटो शेअर केला आहे.
advertisement
1/10
'हे असतं कपल गोल', प्राजक्ता माळीची पोस्ट; शेअर केला खास फोटो
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रीय असलेली अभिनेत्री आहे. प्राजक्ता अनेक पोस्ट शेअर करत असते. तिच्या फोटोंना चाहत्यांची विशेष पसंती मिळते.
advertisement
2/10
प्राजक्ता माळी तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. प्राजक्तानं अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणानं भाष्य केलं आहे.
advertisement
3/10
प्राजक्ता माळी लग्न कधी करणार? तिचा बॉयफ्रेंड आहे का? असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेले असतात. प्राजक्तानं अनेकदा अनेक मुलाखतींमध्ये चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
advertisement
4/10
प्राजक्ताचा ब्रेकअप झाल्याचंही तिनं सांगितलं. प्राजक्ता रिलेशनशिपमध्ये होती. पण समोरची व्यक्ती वारंवार खोटं बोलत होती आणि प्राजक्तानं त्याची चोरी पकडली. त्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं.
advertisement
5/10
ब्रेकअपनंतर प्राजक्ता सेटवर चक्कर येऊन पडली होती. तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं, मी माझ्याच झोनमध्ये होती. मला माहिती नाही काय विचार करत होते आणि सीन करताना अचानक चक्कर येऊन पडले. मला काहीच आठवत नव्हतं.
advertisement
6/10
प्राजक्ता काही काळानंतर ब्रेकअपमधून सावरली. प्राजक्ताला आता लग्न देखील करायचं आहे असं तिनं सांगितलं होतं. आई माझ्या वारंवार लग्नासाठी मागे लागते, मी तिला मुलगा शोधायला सांगितलं आहे असंही प्राजक्ता एका मुलाखतीत म्हणाली होती.
advertisement
7/10
प्रेम करण आणि ते टिकवणं ही खूप मोठी जबाबदारी असते. खरे कपल गोल काय असतात हे प्राजक्तानं तिच्या चाहत्यांना दाखवलं. प्राजक्तानं खास फोटो देखील शेअर केला आहे.
advertisement
8/10
प्राजक्तानं तिच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं फोटो शेअर केला आहे. फोटोसह प्राजक्तानं लिहिलंय, "हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी आई-पप्पा. 41 वर्षे पूर्ण… आणि अजून खूप वर्षे एकत्र अशीच जावोत. हेच खरं कपल गोल! 10-02-85 to 10-02-26"
advertisement
9/10
खरं कपल गोल म्हणजे काय हे प्राजक्ताच्या पोस्टमधून चाहत्यांना कळलंच असेल. कपल गोल म्हणजे प्रेम, समजूतदारपणा, चांगल्या वाईट प्रसंगात एकमेकांना साथ देत नातं जपणं आणि एकत्र राहणं, हेच प्राजक्ताला या पोस्टमधून सांगायचं आहे.
advertisement
10/10
प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, प्राजक्ताची देवखेळ ही मराठी वेब सीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. प्राजक्ताची अंकुश चौधरीबरोबर महत्त्वाची भूमिका आहे. मराठी झी 5 वर ही सीरिज तुम्ही पाहू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali : 'हे असतं कपल गोल', प्राजक्ता माळीची पोस्ट; शेअर केला खास फोटो
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल