Health Tips: सावधान! तुम्ही बुलेट कॉफी तर पित नाही ना? असे होतात गंभीर परिणाम
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
बुलेट कॉफी हा प्रकार सध्या चांगलाच ट्रेंडिंग आहे. अनेक सेलिब्रिटी देखील हा ट्रेंड फॉलो करत आहेत.
advertisement
1/5

आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात कॉफीने होते. काहीजण ब्लॅक कॉफी पितात तर काहीजण दुधाची कॉफी पितात. पूर्वी कॉफीचे दोनच प्रकार होते. आता मात्र, कॉफीचे वेगवेगळे प्रकार उदयाला येत आहेत. तुम्ही अनेक सेलिब्रिटींना 'बुलेट कॉफी'बद्दल बोलताना ऐकलं असेल किंवा बघितलं असेल.
advertisement
2/5
कॉफीचा हा प्रकार सध्या चांगलाच ट्रेंडिंग आहे. बुलेट कॉफी म्हणजे काय? आपल्याला तिचा कसा फायदा होतो? ही कॉफी चांगली की वाईट, याबाबत आहारतज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी लोकल 18 शी बोलताना सविस्तर माहिती दिली.
advertisement
3/5
बुलेट कॉफी हा एक कॉफीचा प्रकार आहे. त्यामध्ये उत्तम प्रतीची कॉफी, अनसॉल्टेड बटर आणि नाराळाच्या तेलातून मिळणारं मीडियम-चेन ट्रायग्लिसरायड्स वापरलं जातं. कॅफिन आणि फॅट्स असल्यामुळे या कॉफीतून फार लवकर एनर्जी मिळते.
advertisement
4/5
इंटरमिटंट फास्टिंग आणि केटो डाएट करणाऱ्यांमध्ये ही कॉफी लोकप्रिय आहे. या कॉफीमुळे पोट भरल्यासारखे वाटते, उर्जेची पातळी आणि एकाग्रता वाढते. ज्यांना वजन कमी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी बुलेट कॉफी चांगला पर्याय मानला जातो.
advertisement
5/5
ही कॉफी प्रत्येकासाठी फायदेशीर ठरत नाही. काही अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, बुलेट कॉफीतील बटरमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकते. हार्ट डिसीज असलेल्यांना सॅच्युरेटेड फॅटचा धोका वाढू शकतो. त्यामुळे या रुग्णांनी बुलेट कॉफीचं सेवन करू नये. तुम्हाला जर बुलेट कॉफी पिण्याची इच्छा असेल तर आहारतज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: सावधान! तुम्ही बुलेट कॉफी तर पित नाही ना? असे होतात गंभीर परिणाम