TRENDING:

'कानात बोटं घालून गप बस', अनुश्रीनं घेतला राखीशी पंगा, ड्रामा क्विन आता कसा दाखवणार इंगा? VIDEO

Last Updated:

Rakhi Sawant : बिग बॉस मराठी 6 मध्ये राखी सावंत वाईल्ड कार्ड एन्ट्रीने घरात वातावरण बदललं आहे. अशातच अनुश्रीसोबत तिचं जोरदार भांडण पाहायला मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिग बॉस मराठी 6 च्या घरात ड्रामा क्विन राखी सावंतनं एन्ट्री घेतली आहे. राखी वाईल्ड कार्ड म्हणून घरात आली आहे. राखी सावंत घरात दाखल झाल्यापासून वातावरण अधिकच रंगतदार झालं आहे. राखीच्या एन्ट्रीनंतर घरातील समीकरणं बदलताना दिसत आहेत. तिच्या बिनधास्त स्वभावामुळे घरात चर्चा आणि वाद सुरू झाले आहे. राखीने आल्या आल्या तन्वीला चॅलेंज दिलं. पण अनुश्री आता राखीच्या वाट्याला गेली असून दोघींचं चांगलंच भांडण झालं आहे.
News18
News18
advertisement

बिग बॉसच्या घरात सकाळची सुरुवात गाण्यांनी होते. मात्र याच गोष्टीवरून राखी आणि अनुश्रीमध्ये वादाची ठिणगी पडली. अनुश्री झोपेत असताना राखीनं तिचं पांघरूण काढते. यामुळे अनुश्री चिडली आणि राखीला थेट विचारलं, "मी झोपलेले असताना तू माझं पांघरूण का काढलंस? मला बिलकुल नाही आवडत. प्लीज."

( विशालच्या हातात बिग बॉसची ताकद! Power Key घेणार काढून; कोणाचा गेम पालटणार, VIDEO )

advertisement

अनुश्रीच्या या प्रश्नावर राखीनं तिच्या नेहमीच्या अंदाजात उत्तर दिलं. ती म्हणाली, "म्हणून ते चार चार वेळा गाणं लावतात आणि माझ्या डोक्याची नस फाटते." यावर अनुश्री म्हणते, "ते ऑलवेज चार चार वेळाच गाणं लावतात," असं ती म्हणाली. राखी म्हणाली, "त्यांचा कोंबडा चार चार वेळा वाजतो म्हणून मी तुझ्याकडे आले आणि तुझा कोंबडा (पांघरूण) खाली घेतला".

advertisement

राखीच्या या बोलण्यावर अनुश्री चिडली. ती म्हणाली, "मी तर झिंज्या पकडते, झिंज्या". यावर राखीनं अनुश्रीला ठणकावून सांगितलं, "हे असं नाही चालणार. बिग बॉस माझं डोकं फिरवणार सकाळी सकाळी. गाण्यांवर गाणी लावणार".

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रासायनिक खतामुळे दुष्परिणाम, अशी करा नैसर्गिक शेती, उत्पादनात होईल भरघोस वाढ
सर्व पहा

वाद इथेच थांबला नाही. अनुश्रीनं राखीला सुनावत म्हटलं, ठकानात बोटं घालून गप्प बसत जा मग. ऐकत नको जाऊ गाणी." राखी आणि अनुश्रीमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. अनुश्रीनं राखीसोबत पंगा घेतला. आता राखी तिला कसा इंगा दाखवणार हे येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'कानात बोटं घालून गप बस', अनुश्रीनं घेतला राखीशी पंगा, ड्रामा क्विन आता कसा दाखवणार इंगा? VIDEO
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल