advertisement

रासायनिक खतामुळे दुष्परिणाम, अशी करा नैसर्गिक शेती, उत्पादनात होईल भरघोस वाढ, Video

Last Updated:

जमिनीची सुपीकता घटणे, पाण्याचे प्रदूषण, वाढते शेतीखर्च आणि शेतकऱ्यांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम यामुळे अनेक शेतकरी पर्यायी मार्गांचा शोध घेत आहेत.

+
पारंपरिक

पारंपरिक शेतीतून नैसर्गिक शेतीकडे वाटचाल 

बीड : रासायनिक खतं, कीटकनाशकं आणि तणनाशकांवर आधारित पारंपरिक शेतीमुळे सुरुवातीच्या काळात उत्पादनात वाढ झाली असली तरी दीर्घकालीन दुष्परिणाम आता प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. जमिनीची सुपीकता घटणे, पाण्याचे प्रदूषण, वाढते शेतीखर्च आणि शेतकऱ्यांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम यामुळे अनेक शेतकरी पर्यायी मार्गांचा शोध घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात तसेच देशभरात नैसर्गिक शेतीकडे वळण्याची चळवळ वेग घेताना दिसत आहे. याबद्दलच कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी माहिती दिली.
नैसर्गिक शेतीकडे वळताना शेतकऱ्यांनी घाई न करता टप्प्याटप्प्याने बदल करणे अधिक फायदेशीर ठरत आहे. सर्वप्रथम माती परीक्षण करून जमिनीतील सेंद्रिय कर्ब, अन्नद्रव्यांची पातळी आणि मातीचा प्रकार समजून घेणे आवश्यक आहे. रासायनिक खतांचा वापर अचानक बंद न करता हळूहळू कमी करून शेणखत, कंपोस्ट, जीवामृत, घनजीवामृत व गोमूत्रावर आधारित द्रावणांचा वापर वाढवावा, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
advertisement
बियाण्यांची निवड आणि प्रक्रिया ही नैसर्गिक शेतीतील महत्त्वाची बाब मानली जाते. देशी बियाण्यांची बीजप्रक्रिया केल्यास पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि उगवणही चांगली होते. यामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच रासायनिक औषधांवरील अवलंबित्व घटते, ज्यामुळे शेतीखर्चात लक्षणीय बचत होते.
advertisement
नैसर्गिक शेतीत पीक नियोजन आणि व्यवस्थापनाला विशेष महत्त्व आहे. आंतरपीक, मिश्रपीक आणि पीक फेरपालट या पद्धतींचा अवलंब केल्यास जमिनीतील अन्नद्रव्यांचे संतुलन राखले जाते. तण नियंत्रणासाठी रासायनिक तणनाशकांऐवजी मल्चिंग, आच्छादन पिके आणि हाताने निंदणी यांचा वापर केला जातो, ज्यामुळे मातीचा कस टिकून राहतो.
सुरुवातीच्या एक-दोन हंगामात उत्पादन थोडे कमी वाटू शकते, मात्र नैसर्गिक शेतीमुळे खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. काही वर्षांत जमिनीची सुपीकता वाढल्याने उत्पादन स्थिर होते. शिवाय नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या शेतमालाला बाजारात चांगला दर मिळत असल्याने ही शेती दीर्घकाळ शाश्वत आणि फायदेशीर ठरत असल्याचे अनेक यशस्वी शेतकऱ्यांचे अनुभव सांगतात.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
रासायनिक खतामुळे दुष्परिणाम, अशी करा नैसर्गिक शेती, उत्पादनात होईल भरघोस वाढ, Video
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement