advertisement

'फालतू हिंमत करू नका', वशिलेबाजी करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम! प्रसिद्ध संगितकाराने नव्या गायकांना भरला दम

Last Updated:
एका नवोदित गायकाने थेट मंत्र्यांचा वशिला लावून विशालकडे काम मागण्याचा केलेला प्रयत्न. पण विशालने या शॉर्टकट मारणाऱ्या गायकाला आणि त्या मंत्र्याला असं काही झापलंय की, संपूर्ण सिनेसृष्टीत सध्या याचीच चर्चा सुरू आहे.
1/10
बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीतकार आणि गायक विशाल दादलानी हा त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. जे मनात आहे ते तोंडावर बोलणाऱ्या विशालचा नुकताच रुद्रावतार पाहायला मिळाला आहे.
बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीतकार आणि गायक विशाल दादलानी हा त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. जे मनात आहे ते तोंडावर बोलणाऱ्या विशालचा नुकताच रुद्रावतार पाहायला मिळाला आहे.
advertisement
2/10
निमित्त ठरलंय ते म्हणजे एका नवोदित गायकाने थेट मंत्र्यांचा वशिला लावून विशालकडे काम मागण्याचा केलेला प्रयत्न. पण विशालने या शॉर्टकट मारणाऱ्या गायकाला आणि त्या मंत्र्याला असं काही झापलंय की, संपूर्ण सिनेसृष्टीत सध्या याचीच चर्चा सुरू आहे.

3/10
विशाल दादलानीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नवोदित गायकांना खडे बोल सुनावले आहेत.
विशाल दादलानीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नवोदित गायकांना खडे बोल सुनावले आहेत.
advertisement
4/10
विशालने लिहिलं,
विशालने लिहिलं, "नवोदित गायकांसाठी एक सल्ला, मला एखाद्या मंत्र्याकडून किंवा त्यांच्या सेक्रेटरीकडून फोन लावायची फालतू हिंमत करू नका. जर तुम्ही असं केलंत, तर तुम्ही मला आयुष्यात कधीही भेटू शकणार नाही, याची ही खात्रीशीर पद्धत आहे."
advertisement
5/10
विशाल इथेच थांबला नाही, त्याने त्या गायकाचं कॅरेक्टर सर्टिफिकेटच दिलं. तो म्हणाला,
विशाल इथेच थांबला नाही, त्याने त्या गायकाचं कॅरेक्टर सर्टिफिकेटच दिलं. तो म्हणाला, "ज्या मुलाने नुकताच हा प्रयत्न केलाय, त्याला सांगतो की, मी त्या मंत्र्याला ब्लॉक केलंय आणि तुलाही. आता तू कितीही चांगला गायक असला तरी मला तुझ्यासोबत काम करण्यात शून्य रस आहे. सॉरी!"
advertisement
6/10
विशालच्या मते, ज्यांना स्वतःच्या टॅलेंटवर विश्वास नसतो, तेच लोक अशा वशिलेबाजीचा आधार घेतात.
विशालच्या मते, ज्यांना स्वतःच्या टॅलेंटवर विश्वास नसतो, तेच लोक अशा वशिलेबाजीचा आधार घेतात.
advertisement
7/10
विशालच्या या आक्रमक पोस्टनंतर एका चाहत्याने त्याला विचारलं की, मग नव्या टॅलेंटने तुमच्यापर्यंत पोहोचायचं कसं? यावर विशालने अत्यंत सकारात्मक उत्तर दिलं.
विशालच्या या आक्रमक पोस्टनंतर एका चाहत्याने त्याला विचारलं की, मग नव्या टॅलेंटने तुमच्यापर्यंत पोहोचायचं कसं? यावर विशालने अत्यंत सकारात्मक उत्तर दिलं.
advertisement
8/10
तो म्हणाला,
तो म्हणाला, "तुमचं संगीत लोकांपर्यंत पोहोचवा. जर तुमचं काम खरोखर चांगलं असेल, तर ते माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. शिवाय, मी लवकरच एक नवीन प्लॅटफॉर्म सुरू करत आहे, जिथे दर आठवड्याला नवीन कलाकारांचा शोध घेतला जाईल."
advertisement
9/10
विशालने याआधी अरिजित सिंगच्या निवृत्तीच्या चर्चेवेळीही एक गूढ पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने म्हटलं होतं की, यश मिळालं म्हणजे शांती किंवा समाधान मिळेलच असं नाही.
विशालने याआधी अरिजित सिंगच्या निवृत्तीच्या चर्चेवेळीही एक गूढ पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने म्हटलं होतं की, यश मिळालं म्हणजे शांती किंवा समाधान मिळेलच असं नाही.
advertisement
10/10
 "आयुष्य खूप छोटं आहे, स्वतःशी खोटं बोलून वेळ वाया घालवू नका. दुसऱ्याला हवं तसं जगण्यापेक्षा स्वतःला हवं तसं जगा," असा मोलाचा सल्लाही त्याने दिला.<span style="font-size: 20px;"> </span>
"आयुष्य खूप छोटं आहे, स्वतःशी खोटं बोलून वेळ वाया घालवू नका. दुसऱ्याला हवं तसं जगण्यापेक्षा स्वतःला हवं तसं जगा," असा मोलाचा सल्लाही त्याने दिला. 
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement