advertisement

13 फेब्रुवारीला सगळी संकटं होणार दूर, न चुकता करा 'हे' 3 सोपे उपाय; प्रत्येक कामात मिळेल यश!

Last Updated:
हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यातही माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी 'विजया एकादशी' ही अत्यंत फलदायी मानली जाते.
1/7
हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यातही माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी 'विजया एकादशी' ही अत्यंत फलदायी मानली जाते. यंदा शुक्रवार, 13 फेब्रुवारी 2026 रोजी विजया एकादशी साजरी केली जाणार आहे. नावाप्रमाणेच ही एकादशी जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवून देणारी आणि शत्रूंवर मात करण्याची शक्ती देणारी मानली जाते.

2/7
पौराणिक कथेनुसार, प्रभू श्रीरामांनी लंकेवर विजय मिळवण्यासाठी समुद्रकिनारी वकदालभ्य मुनींच्या सांगण्यावरून हे व्रत केले होते. जर तुम्हालाही तुमच्या कार्यात यश हवे असेल आणि घरातील नकारात्मकता दूर करायची असेल, तर 13 फेब्रुवारीला काही विशेष उपाय करणे शुभ ठरेल.

3/7
पिवळ्या वस्त्रांचा वापर आणि संकल्प: एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. विष्णू देवाला पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे, कारण तो समृद्धीचे प्रतीक मानला जातो. या दिवशी न चुकता पिवळ्या रंगाचे स्वच्छ कपडे परिधान करावेत. पूजेच्या वेळी हातात जल घेऊन यशासाठी आणि सुख-शांतीसाठी 'संकल्प' करावा.

4/7
केसरयुक्त हलव्याचा नैवेद्य: भगवान विष्णूंना अर्पण केलेला नैवेद्य हा सात्विक असावा. या दिवशी अन्नाचा त्याग करून फलाहार केला जातो. घरात रव्याचा किंवा शिंगाड्याच्या पिठाचा हलवा बनवून त्यात केसर घालावे. केशराचा पिवळा रंग आणि सुगंध विष्णूंना प्रसन्न करतो. हा केसरयुक्त हलवा तुळशीचे पान ठेवून देवाला अर्पण केल्यास घरामध्ये धान्य आणि धनाचा तुटवडा भासत नाही.

5/7
गंगाजल आणि तुळशीचा उपाय: एकादशीच्या पूजेत तुळशीला सर्वाधिक महत्त्व आहे. विष्णूंची पूजा तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते. एका छोट्या तांब्यात गंगाजल घ्यावे आणि त्यात एक तुळशीचे पान टाकावे. हा तांब्या भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर ठेवावा. पूजा संपल्यानंतर हे तीर्थ म्हणून प्राशन केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते.

6/7
'द्वादशाक्षर' मंत्राचा जप: विजया एकादशीच्या दिवशी नामस्मरणाचे फळ हजारो पटीने अधिक मिळते.
'द्वादशाक्षर' मंत्राचा जप: विजया एकादशीच्या दिवशी नामस्मरणाचे फळ हजारो पटीने अधिक मिळते. "ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः" या प्रभावशाली मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करावा. हा जप करताना विष्णूंचे ध्यान केल्याने मानसिक शांती मिळते आणि कामातील अडथळे दूर होतात.
advertisement
7/7
दान आणि सेवेचे महत्त्व: विजया एकादशीला गरिबांना फळे किंवा पिवळ्या वस्तूंचे दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. या दिवशी कोणाबद्दलही मनात द्वेष न ठेवता सात्विक वृत्तीने राहणे महत्त्वाचे आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement